पुण्यात १२ महिन्यांत घराच्या किमती वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:53+5:302021-09-02T04:19:53+5:30

पुणे : ‘इंडिया बायर सर्व्ह २०२१-लिव्हिंग इन दि टाइम्स ऑफ कोविड-१९’ या सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुण्यातील ५३ टक्के घरमालकांना पुढील ...

In Pune, house prices will go up in 12 months | पुण्यात १२ महिन्यांत घराच्या किमती वाढणार

पुण्यात १२ महिन्यांत घराच्या किमती वाढणार

googlenewsNext

पुणे : ‘इंडिया बायर सर्व्ह २०२१-लिव्हिंग इन दि टाइम्स ऑफ कोविड-१९’ या सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुण्यातील ५३ टक्के घरमालकांना पुढील १२ महिन्यांमध्ये त्यांच्या प्राथमिक घराच्या किंमतीमध्ये १ ते ९ टक्क्यांनी वाढ होण्याची आशा आहे. पुण्यातील जवळपास ४४ टक्के नागरिक दुसऱ्या शहरांमध्ये स्थलांतर करण्यास इच्छुक आहेत. जवळपास दोनपैकी एका नागरिकाने पुढील १२ महिन्यांमध्ये दुसरे घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली.

घरांच्या किमतीत वाढ होण्यासंदर्भात शहरातील ५३ टक्के नागरिकांनी पुढील १२ महिन्यांमध्ये त्यांच्या विद्यमान घराच्या किमतीमध्ये १ ते ९ टक्क्यांनी वाढ होण्याची आशा व्यक्त केली. हा आशावादी सेन्टिमेंटल मूल्याप्रती लक्षणीय बदल आहे. ६६ टक्के नागरिकांनी महामारीच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या प्राथमिक घराच्या किमतीमध्ये घट होण्याची आशा खासगी रिअल इस्टेट सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मांडली आहे.

Web Title: In Pune, house prices will go up in 12 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.