पुण्याचा आयटी इंजिनिअर पाक गुप्तहेरांच्या संपर्कात; स्पेशल टास्क फोर्सने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:19 AM2023-07-08T07:19:15+5:302023-07-08T07:19:23+5:30

जांबुरे हा अनेक वर्षांपासून सतत पाकिस्तानी गुप्तचर आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता.

Pune IT engineer in touch with Pakistan spies; The Special Task Force made the arrest | पुण्याचा आयटी इंजिनिअर पाक गुप्तहेरांच्या संपर्कात; स्पेशल टास्क फोर्सने केली अटक

पुण्याचा आयटी इंजिनिअर पाक गुप्तहेरांच्या संपर्कात; स्पेशल टास्क फोर्सने केली अटक

googlenewsNext

पुणे : वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) घोटाळ्यात कथित सहभाग आणि उच्चस्तरीय पाकिस्तानी गुप्तचर कार्यकर्त्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली क्राइम ब्रँचच्या स्पेशल टास्क फोर्सने गुरुवारी पुण्यातून एकाला अटक केली. अभिजित संजय जांबुरे (३२) असे त्याचे नाव असून, ट्रान्झिट रिमांडवर भुवनेश्वरला आणण्यापूर्वी तेथील स्थानिक न्यायालयात त्याला हजर करण्यात आले.

जांबुरे हा अनेक वर्षांपासून सतत पाकिस्तानी गुप्तचर आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. २०१८ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ताे पाकिस्तानी नागरिक सय्यद दानिश अली नकवीच्या संपर्कात आला. नकवी हा फैजलाबादचा रहिवासी असून, त्याने स्वत:ची ओळख चेगमध्ये अमेरिकन एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीत काम करणारा फ्रिलान्सर म्हणून केली होती. जांबुरेने त्याचा यूझर आयडी आणि चेगचा पासवर्ड दानिश नकवीला दिला.

दानिशने काही लोकांना जांबुरे याच्या वतीने एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीसाठी काम करायला लावले. ओडिशा आणि देशाच्या इतर भागांतील सायबर चोरट्यांकडून ओटीपी, खासगी माहिती आणि बँक खात्यांची खरेदी केली. त्याच्या बदल्यात कामाचे पैसे जांबुरे यांच्या भारतातील बँक खात्यात जमा झाले. जांबुरेने पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या एजंट्सना पैसे दिले, असे एसटीएफच्या अधिकाऱ्याने 
सांगितले.

दानिशने नंतर जांबुरेची ओळख त्याचा मित्र अब्दुल हमीद ऊर्फ खुर्रमशी करून दिली, जो कराचीचा रहिवासी आहे. खुर्रम हा पाकिस्तानी लष्कराचा एक वरिष्ठ गुप्तचर अधिकारी असून, त्याच्याकडे भारतात एजंटांचे मोठे नेटवर्क आहे. खुर्रमच्या सूचनेनुसार जांबुरेने भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचरांना पैसे हस्तांतरित केले. एसटीएफच्या तपासात असे दिसून आले की, जांबुरेने व्हाॅट्सॲपवर किमान सात पाकिस्तानी आणि १० नायजेरियन नागरिकांशी संपर्क केला.

कोण आहे अभिजित जांबुरे? 
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या जांबुरे याने गुजरातमधील आणंद येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करत होता. त्याने सांख्यिकी विषयातील पदवी मिळवली आहे.

Web Title: Pune IT engineer in touch with Pakistan spies; The Special Task Force made the arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.