Pune: जमिनीच्या वादातून जेजुरीचे माजी नगरसेवकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 10:36 AM2023-07-08T10:36:25+5:302023-07-08T10:36:41+5:30
Pune: धालेवाडी गावाच्या हद्दीत नाझरे धरणाच्या शेजारील शेतात जमिनीच्या जुन्या वादातून जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूबभाई सय्यदलाल पानसरे वय ४८ यांच्या सह तिघांवर पाच जणांनी कुऱ्हाड व कोयत्याने वार केले. यात माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जेजुरी - धालेवाडी गावाच्या हद्दीत नाझरे धरणाच्या शेजारील शेतात जमिनीच्या जुन्या वादातून जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूबभाई सय्यदलाल पानसरे वय ४८ यांच्या सह तिघांवर पाच जणांनी कुऱ्हाड व कोयत्याने वार केले. यात माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि ७ रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जेजुरी पोलिसांनी कुऱ्हाड व कोयत्याने मारहान करणाऱ्या वनेश प्रल्हाद परदेशी,किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी रा. बेंद वस्ती जेजुरी, व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे .या शेतात ट्रकटर द्वारे शेतीची मशागत सुरु होती. मेहबूब पानसरे व त्यांचे बरोबर इतर तिघेजण हे शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी वनेश परदेशी यांचे मेहबूब पानसरे यांच्यात जमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून भांडण झाले. यावेळी वनेश परदेशी त्यांची दोन मुले,इतर पाच जणांनी मेहबूब पानसरे व इतर दोघांवर कुऱ्हाड व कोयत्याने वार केले .यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून मेह्बून पानसरे मानेवर खोलवर वार झाल्याने त्याच्यावर जेजुरीतील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विभागीय पोलीस अधिकारी तानाजी भरडे, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. पुढील तपास सुरु आहे.