Pune: कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा! कोथरूडमध्ये झळकले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 00:17 IST2025-02-26T00:16:36+5:302025-02-26T00:17:25+5:30
Pune: गुन्हेगारांना नेमका पोलिसांचा धाकच राहिला नाही का सवाल कोथरूडकारांनी केला आहे. त्यामुळे समस्त गावकरी कोथरूड व त्रस्त नागरिक यांच्या वतीने कोथरूडच्या विविध भागात या प्रकरणाचा जाहीर निषेध म्हणून बॅनर्स फ्लेक्स लागले आहेत.

Pune: कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा! कोथरूडमध्ये झळकले बॅनर
कोथरूड - पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आताच्या परिस्थितीमध्ये रोज काही ना काही गुन्ह्यांच्या घटना कोथरूड मध्ये घडत आहेत. काही दिवसांपूर्वी खून, मारामाऱ्या, धमकावणे व सामान्य नागरिकांच्या गाड्यांच्या काचा, तोडफोड करणे अशा घटना घडल्या आहेत. अशा गुन्हेगारांना नेमका पोलिसांचा धाकच राहिला नाही का सवाल कोथरूडकारांनी केला आहे. त्यामुळे समस्त गावकरी कोथरूड व त्रस्त नागरिक यांच्या वतीने कोथरूडच्या विविध भागात या प्रकरणाचा जाहीर निषेध म्हणून बॅनर्स फ्लेक्स लागले आहेत.
पौड रोड, डीपी रोड, गुजरात कॉलनी,शास्त्रीनगर, मयूर कॉलनी, आझाद नगर, कर्वे रस्ता, अशा अन्य ठिकाणी कोथरूडकारांनी जाहीर निषेध म्हणून बॅनर फ्लेक्स लावून निषेध व्यक्त केला आहे. यात, कोथरूड च बीड होण्यापासून वाचवा. आमच कोथरूड अस नव्हत!
गुन्हेगारांना अभय कोण देत ? त्यांना पैसा कोण पुरवत, पोशिंदा कोण ?पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का ?
गुन्हेगारी प्रवृत्त करणाऱ्या रिल्स कोण पसरवत ? छोटे मोठे व्यावसायिकांची मुस्कट दाबी कोण करत? गुन्हेगारांना राजकीय अभय नको ? गुन्हेगारांना रस्ता अडवून, कर्कश व नियमबाह्य साउंड लावून उन्माद माजवायला पॉन्सरशिप कोण करत अश्या प्रकारे गुन्हेगारांना संघटीत होण्यास कोण प्रवृत्त करत? गुन्हेगारी वृत्तीचे लोक वर्गणीच्या नावाखाली घोळक्याने खंडणी मागतात कारवाई कोण करणार? गुन्हे नोंद असणाऱ्या गुन्हेगारांचे अनधिकृत फ्लेक्स बॅनर वर चमकोगिरी वर का कारवाई होत नाही ?
कोथरूड मध्ये सतत होणाऱ्या चोऱ्या, खून, हाणामाऱ्या याला जबाबदार कोण ? असा मजकूर लिहून थेट कोथरूडकारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रश्न विचारले आहेत. दोन मंत्री पदे कोथरूड विधानसभेत आहेत. त्यामुळे अशा घटनांना कोथरूडमध्ये आळा बसेल का अशी चिंता कोथरूडकारांनी यावेळी व्यक्त केली.