पुणे कीर्तन महोत्सव यंदा ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:28 AM2020-12-04T04:28:27+5:302020-12-04T04:28:27+5:30

जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशिर्वादाने आणि गुरुवर्य डॉ.किसन महाराज साखरे गौरवार्थ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन ...

Pune Kirtan Festival online this year | पुणे कीर्तन महोत्सव यंदा ऑनलाईन

पुणे कीर्तन महोत्सव यंदा ऑनलाईन

Next

जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशिर्वादाने आणि गुरुवर्य डॉ.किसन महाराज साखरे गौरवार्थ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) विभागप्रमुख डॉ. प्रविण भोळे यांच्या हस्ते होणार आहे.

महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ५ डिसेंबर रोजी कीर्तनकार मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांना कीर्तन कोविद कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी उपस्थित राहणार आहेत. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी या फेसबुक पेजवरुन हा महोत्सव रसिकांना विनामूल्य पहायला मिळणार आहे.

Web Title: Pune Kirtan Festival online this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.