‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ अंमबजावणीत देशात पुणे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:42+5:302021-02-25T04:13:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्वाधिक चांगले काम केल्याने पुणे जिल्हा देशात अव्वल ठरला ...

Pune leads in implementation of 'Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi' | ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ अंमबजावणीत देशात पुणे अव्वल

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ अंमबजावणीत देशात पुणे अव्वल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्वाधिक चांगले काम केल्याने पुणे जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. या कामगिरीसाठी केंद्र सरकारने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांचा केंद्रीय कृषी तथा कृषी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते उल्लेखनीय कामासाठीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

पी. एम. किसान योजनेंतर्गत Grievance Redressal (तक्रार निवारण) या बाबीखाली पुणे जिल्ह्याने उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ५ लक्ष ३० हजार २३५ एवढी आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत ५०० कोटी ५४ लाख १४ हजार एवढा निधी पोर्टलद्वारे जमा केला. भौतिक तपासणीसाठी २० हजार १३ एवढ्या लाभार्थ्यांची यादी पोर्टलद्वारे प्राप्त झाली होती. त्याचे कामकाज १०० टक्के पूर्ण केले आहे. योजनेतील १ लक्ष ७९ हजार एवढ्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. तसेच लाभार्थ्यांच्या बँकेचा चुकीचा तपशील ४८ हजार २९५ इतका दुरुस्त केला आहे. तसेच तक्रार निवारणाकरिता १,२३५ एवढ्या तक्रारी प्राप्त होत्या. त्याचे संपूर्ण निराकरण केले आहे. आयकर भरणारे व इतर कारणामुळे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांकडून ५ कोटी ८० लक्ष ५८ हजार इतक्या रकमेची वसुली केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये काम करताना सर्व तालुकास्तरीय यंत्रणेचा दैनंदिन आढावा व्हीसीद्वारे व बैठकीद्वारे घेतला. तसेच दैनंदिन कामकाजानुसार तालुक्यांचे अनुक्रम ठरविले व त्यानुसार आढावा घेतला.

कोरोनासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत तालुकास्तरावर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी योजनेचे काम ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार पूर्ण केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागातील प्रधानमंत्री योजनेचे काम पाहणारे पथक, राष्ट्रीय सूचना केंद्रातील वैज्ञानिक, सर्व तहसीलदार व त्यांचे पथक तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व मार्गदर्शनामुळे सर्व पथकांनी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

----------

Web Title: Pune leads in implementation of 'Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.