पुणे : केशवनगरमध्ये शिरला बिबट्या, हल्ल्यात पाच जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:06 AM2019-02-04T09:06:09+5:302019-02-04T09:10:52+5:30
मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने चार ते पाच जणांवर हल्ला केला आहे.
पुणे - मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने चार ते पाच जणांवर हल्ला केला आहे. सोमवारी(4 फेब्रुवारी) सकाळी केशवनगर परिसरात या बिबट्याने सात वर्षांच्या मुलाला पकडले. या मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आणखी तीन जणांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले आहेत.
रहिवासी परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती वनविभागाला तातडीने देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या गोंधळामुळे बिबट्या बिथरला आहे. सध्या हा बिबट्या रेणूका माता मंदिरामागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी अथक मेहनत घेत आहेत.
(नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ)
इमारतीमध्ये लपून बसलाय बिबट्या
बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी