अॅम्बी व्हॅलीमध्ये बिबट्याचा शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 09:41 AM2018-12-02T09:41:59+5:302018-12-02T09:46:05+5:30

मावळ तालुक्यातील अँबी व्हॅलीमध्ये शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

Pune : leopard stuck in Hunting net and dies at aamby valley | अॅम्बी व्हॅलीमध्ये बिबट्याचा शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून मृत्यू

अॅम्बी व्हॅलीमध्ये बिबट्याचा शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून मृत्यू

Next

पुणे : मावळ तालुक्यातील अँबी व्हॅलीमध्ये शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यातून सुटण्यासाठी केलेल्या धडपडीत तो जखमी झाला आणि यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकारी अंकिता तरडे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील अॅबी व्हॅलीजवळील विसाघर येथील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी वन विभागाला रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास फोन करुन याची माहिती दिली. गावाजवळ बिबट्याचा मोठा आवाज येत आहे. हा निरोप मिळताच वन विभागाच्या रेंज अधिकारी अंकिता तरडे व त्यांचे सहकारी पौड कार्यालयातून निघाले. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ते घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर रविवारी (2 डिसेंबर) सकाळी या बिबट्याला ग्रामस्थ, सहारा अॅबी व्हॅलीचे कर्मचारी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात आणले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले असून त्या ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याबाबत तरडे यांनी सांगितले की, बिबट्याच्या शरीरात मागच्या बाजूला तार शिरली असून त्यातून सुटका करण्यासाठी त्याने खूप धडपड केली. त्याच्या खुणा आजूबाजूला दिसून येत आहे. आवाजाने घाबरल्याने व रात्र असल्याने लोकांनी पुढे जाऊन पाहिले नाही. नाही तर त्याला वाचविता आले असते.

Web Title: Pune : leopard stuck in Hunting net and dies at aamby valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.