Pune Lockdown : पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर; वाचा सविस्तर, काय राहणार सुरू, काय बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:20 PM2021-05-28T20:20:48+5:302021-05-28T20:26:57+5:30

शनिवार रविवारचे लॉकडाऊन शिथिल : अत्यावश्यक सेवा सुरू; सातही दिवस मर्यादित कालावधी दुकानांना परवानगी....

Pune Lockdown : Consolation to the people of Pune! Municipal Corporation announces new rules | Pune Lockdown : पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर; वाचा सविस्तर, काय राहणार सुरू, काय बंद

Pune Lockdown : पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर; वाचा सविस्तर, काय राहणार सुरू, काय बंद

Next

पुणे : कोरोनाबाधित रूग्णांची झालेली घट लक्षात घेऊन, महापालिका प्रशासनाने पुणेकरांना थोडा दिलासा दिला आहे. आजपासून शनिवार रविवारचे पूर्ण लॉकडाऊनचे आदेश शिथिल करण्यात आले असून, या दोन्ही दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे नवे आदेश जारी केले आहेत. यामुळे १४ एप्रिलपासून शहरात दर आठवड्याच्या शनिवार, रविवारीही बंदी असलेल्या अत्यावश्यक सेवा यापुढे मर्यादित कालावधीकरिता सुरू ठेवता येणार आहेत. 

अत्यावश्यक सेवांमध्ये हे राहणार सुरू..

वैद्यकीय सेवांसह किराणा, भाजीपाला, फळविक्री दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकानांसह) यांचा समावेश आहे.

याचबरोबर पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने, चष्म्याची दुकाने यांचाही समावेश आहे.

-------------------                           

हे राहणार बंद

* सिनेमागृह, नाट्यगृह, ओडिटोरिम, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल आदी बंद रहाणार आहे.

* चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग बंद

* सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता), मॉल, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील. 

* उद्याने, मोकळ्या जागा, मैदाने बंद रहाणार

* सर्व प्रकारची धार्मिक स्थळे

* स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालाय

* पालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था 

* सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, आंदोलने

Web Title: Pune Lockdown : Consolation to the people of Pune! Municipal Corporation announces new rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.