Pune Lockdown : महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना पुण्यात प्रवेशासाठी आता कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:36 PM2021-05-14T22:36:50+5:302021-05-14T22:37:52+5:30

ब्रेक दि चेन अंतर्गत पुणे महापालिका प्रशासनाचा नवीन सुधारित आदेश...

Pune Lockdown : Corona Negative Test Certificate is mandatory for citizens from outside Maharashtra to enter Pune | Pune Lockdown : महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना पुण्यात प्रवेशासाठी आता कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक

Pune Lockdown : महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना पुण्यात प्रवेशासाठी आता कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक

Next

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढले होते. कोरोनाचा झपाट्याने वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिका व जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे.याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत आता महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला पुणे शहरात प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली आहे. 

पुणे महापालिका प्रशासनाने याबाबतचा नवीन आदेश काढला आहे. या आदेशात नमूद केल्याप्रमाणे  महाराष्ट्राबाहेरील राज्यातून पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही वाहतुकीच्या साधनामार्फत प्रवेश करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना पालिका क्षेत्रात येण्यापूर्वी ४८ तास वैधता असणारे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहणार आहे. 

राज्य शासनाचा जिल्हाबंदीचा आदेश....
राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणार्‍यांसाठी डिजिटल पासची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे पासासाठी अर्ज केल्यानंतर अर्जाची संख्येनुसार तो २४ तासाच्या आत मंजूर होतो. आत्तापर्यंत लाखांवर नागरिकांनी ई पाससाठी अर्ज केला आहे. जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ई पास आवश्यक आहे. जिल्ह्याच्या शहराच्या सीमेवर तुम्हाला अडविल्यास व तेथे तुमच्याकडे ई पास नसल्यास तेथून तुम्हाला परत माघारी पाठविले जाऊ शकते.


लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम....

पुण्यात राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. असे असले तरी अजूनही ही संख्या खूप कमी झालेली नाही. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मोकळीक दिली आहे. दुपारपासून रस्त्यावर आलेल्या प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले  आहे.
.....

Web Title: Pune Lockdown : Corona Negative Test Certificate is mandatory for citizens from outside Maharashtra to enter Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.