Pune Lockdown : पुण्यातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविला ; पोलीस आयुक्तांची ट्विटद्वारे माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 06:32 PM2021-04-29T18:32:16+5:302021-04-29T18:46:06+5:30
जर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरात सुरक्षित रहा, असे आवाहन
पुणे : राज्य शासनाने १ मेपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो किती दिवस असावा, याचा निर्णय आज होणार होता. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लॉकडाऊनमध्ये १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे.
https://twitter.com/CPPuneCity/status/1387740800411308037?s=1002
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. आंतरराज्य आणि आंतर जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर ई पास अत्यावश्यक आहे. आतापर्यंत जवळपास ९ हजार जणांना डिजिटल पास देण्यात आले आहेत. जर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरात सुरक्षित रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
३२ हजार पुणेकरांनी केला 'ई-पास'साठी अर्ज
पुणे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आंतर जिल्हा खासगी वाहतूकीला बंदी आणल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून राज्यभरात ई पास सुरु करण्यात आली आहे. आजपर्यंत ३२ हजार ३१५ जणांनी ई पासासाठी अर्ज केले असून त्यापैकी निम्म्याहून अधिक पास नाकारण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुणेकर शहरातील शहरात प्रवासासाठी डिजिटल पाससाठी अर्ज करत आहेत. अशा ४ हजार ३० जणांना पास देण्यात आलेले नाही.
आतापर्यंत केवळ ९ हजार ३६३ जणांना डिजिटल पास मंजूर करण्यात आला आहे. तसेच १६ हजार ३७५ जणांना पास नामंजूर करण्यात आला आहे. तर २ हजार ५४७ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.