Pune Lockdown: पुणे महापालिकेकडून 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन नियमावली; जाणून घ्या, काय राहणार सुरू काय बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 06:29 PM2021-04-14T18:29:26+5:302021-04-14T22:17:51+5:30
राज्यात संचारबंदीची घोषणा केल्यानंतर पुण्यातही 'ब्रेक द चेन'
पुणे : राज्य शासनाने राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेह काढल्यानंतर पुणे महानगरपालिकेनेही शहरासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या नवीन आदेशप्रमाणे पुण्यात संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
राज्यासाठी रात्री आठपर्यंतची वेळ देण्यात आलेली असली तरी पुण्यासाठी ही वेळ दोन तास अलीकडे घेण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा ते सोमवारी सकाळी सात पर्यंत यापूर्वीच्या आदेशानुसार पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे.
यासोबतच घरगुती क्षेत्रात काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक तसेच घरी असलेल्या रुग्णांचे वैद्यकीय मदतनीस, नर्स यांना आठवड्यातील एरव्ही दिवस सकाळी सात ते रात्री दहा यावेळेत प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालिकेच्या हद्दीतील कंपन्या मात्र बंद राहणार आहेत. सेवा आणि वस्तुच्या दुकानात काम करणार्या कर्मचार्यांचे लसीकरण करणे बंधनकारक आहे. ग्राहकांशी कमीत कमी संपर्क येईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेची सर्व कार्यालये, केंद्र-राज्य-स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, खासगी-सरकारी-सहकारी बँका, विमा कंपन्या, वित्तीय महामंडळे, वकील, सीए यांच्या कार्यालयांना सूट देण्यात आली आहे. ही कार्यलये ५० टक्के उपस्थितीने सुरू ठेवता येणार आहेत. कोरोना विषयक कामकाज करणार्या आस्थापना १०० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधीत आस्थापनांना देण्यात आला आहे.
------
या सेवा रहाणार सुरू
*अत्यावश्यक सेवा म्हणून सूट देण्यात आलेल्या सेवा
*रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, लसीकरण, वैद्यकीय विमा, आरोग्य सेवा, वाहतूक व पुरवठा करणार्या आस्थापना, लस सॅनिटायझर, वैद्यकीय साहित्य उपकरणे यांच्याशी निगडीत सेवा
* पशु वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने
* किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थाची दुकाने
* शीतगृह आणि गोदाम सेवा
* सार्वजनिक वाहतूक-टॅक्सी, रिक्षा, विमान सेवा
* वेगवेगळ्या देशांची राजदुत कार्यालये
* पावसाळी नियोजनाची कामे
* स्थानिक प्राधिकरणाकडुन पुरवण्यात येणार्या सेवा
* रिझर्व बँकने अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा
* दुरसंचार सेवा आणि त्याच्याशी निगडीत देखभाल दुरुस्ती
* स्टॉक एक्स्चेंज तसेच सेबीशी संबंधीत कार्यालये
* मालवाहतूक
* पाणी पुरवठा सेवा
* कृषी संबंधित सर्व सेवा
* सर्व प्रकारची आयात निर्यात
* ई- कॉमर्स (अत्यावश्यक सेवेतील वस्तू आणि सेवांचा पुरवठा)
* पेट्रोल पंप आणि संबंधित उत्पादने
* शासकीय अणि खासगी सुरक्षा
* एटीएम
* पोस्टल सेवा
* औषधे, लस, औषध वाहतूक
* कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करणारे पुरवठादार
* पावसाळ्याच्या हंगामासाठी नागरिक अथवा संस्थांसाटी साहित्याची निमिर्ती करणार्या सेवा
* माहिती तंत्रज्ञानाशी संबंधीत पायाभूत सेवा
* आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे घोषित केलेल्या अत्यावश्य सेवा
* अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल पुरविणाऱ्या व निर्मिती संस्था
* मटन, चिकन, अंडी मासे विक्रीची दुकाने
-----------------
सेवा पुरवणार्या आस्थापनांसाठी सुचना
संचारबंदीच्या कालावधीमध्ये फक्त नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. परंतु, वस्तू आणि सेवा यांच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत.
--------
सार्वजनिक वाहतूक
रिक्षामधून वाहन चालक आणि दोनच व्यक्ती प्रवास करू शकणार आहेत. टॅक्सीमधून आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. बसमधून मात्र आसन क्षमतेनुसार प्रवास करता येणार आहे. प्रवासादरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांमधून प्रवास करणार्यांना मास्क आवश्यक आहे. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक सेवा वगळून संपुर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.
---------
हॉटले बार
महापालिका क्षेत्रातील हॉस्टेल, बार बंदच राहणार असून रात्री ११ वाजेपर्यंत केवळ पार्सल सेवा सुरु राहणार आहे.
------------
रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल
रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टोल्सलाही सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत पार्सल सेवा देता येणार आहे. स्टॉलवर उभे राहून खाण्यास मनाई आहे.
------
दैनिक वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिकांसह त्यांच्या छपाई व वितरणास परवानगी देण्यात आलेली आहे. वर्तमान पत्र अत्यावश्यक सेवेत मोडत असून या उद्योगाशी संबंधीत सेवा सुरू राहणार आहेत.
---------
महापालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांचे साईट ऑफिस, आर्किटेक्चर ऑफिससुद्धा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
--------
उत्पादन क्षेत्र
ज्या कंपन्यांचे काम शिफ्टमध्ये चालते त्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची बसेस, खासगी वाहनांमधून ने-आण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कामगारांनी ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.
---------
हे राहणार बंद
* सिनेमागृह, नाट्यगृह, ओडिटोरिम, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल आदी बंद रहाणार आहे.
* चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग बंद
* सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता), मॉल, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील.
* उद्याने, मोकळ्या जागा, मैदाने बंद रहाणार
* सर्व प्रकारची धार्मिक स्थळे
* स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालाय
* पालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था (दहावी बारावीच्या शिक्षक तसेच परीक्षार्थी विद्यार्थी वगळून)
* सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, आंदोलने
------
लग्न समारंभात आता फक्त २५ लोकांनाच सहभागी होता येणार आहे. मंगल कार्यलयातील कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणे आवश्यक आहे.
------
अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्याच्याशी संबंधित विधींना अधिकाधिक २० लोकांनाच परवानगी