Pune Lockdown: लाॅकडाऊनच्या घोषणेनंतर फळभाज्या, भाजीपाल्याचे दर कडाडले; पुणेकरांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 08:06 PM2021-04-14T20:06:22+5:302021-04-14T20:06:56+5:30

लाॅकडाऊनमध्ये भाजीपाला विक्री सुरू राहणार असतानाही बुधवारी खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी 

Pune Lockdown : Prices increasing of fruits and vegetable after the announcement lockdown; Huge crowd of people for shopping | Pune Lockdown: लाॅकडाऊनच्या घोषणेनंतर फळभाज्या, भाजीपाल्याचे दर कडाडले; पुणेकरांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Pune Lockdown: लाॅकडाऊनच्या घोषणेनंतर फळभाज्या, भाजीपाल्याचे दर कडाडले; पुणेकरांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Next

पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे मात्र बुधवारी सकाळ पासूनच शहराच्या विविध  भागात लोकांनी फळभाज्या, पालेभाज्या खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केली. लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेत किरकोळ विक्रेत्यांनी दरामध्ये तब्बल 20-30 टक्क्यांनी वाढ केली. 

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून,  पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. यामुळेच सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून, रुग्णांना रेमडेसिविर औषधासह व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध होत नाहीत. या गंभीर परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने एप्रिल अखेर पर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे.

शासनाने लाॅकडाऊन जाहीर केला असला तरी अत्यावश्यक सेवा म्हणजे भाजीपाला, किराणा दुकानासह , दुध विक्री सुरूच राहणार आहे. परंतु भाजीपाला खरेदी करण्यासाठी देखील बाहेर पडता येईल का या धास्तीने बुधवारी सकाळ पासूनच लोकांनी फळभाज्या, पालेभाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली. मार्केट यार्डात बुधवारी नियमित पेक्षा थोडी अधिक आवक होऊन देखील मागणी वाढल्याने घाऊकमध्ये देखील थोडी दर वाढ झाली, परंतु किरकोळ विक्रेत्यांनी लोकांच्या भितीचा फायदा घेत फळभाज्यांमध्ये मोठी दर वाढ केली. पंधरा रुपयांची कोथींबीर गड्डी 25 ते 30 रुपये, तर अन्य फळभाज्यांमध्ये देखील 20-30 टक्क्यांनी दर वाढ केली. 
-------
भाजीपाला     घाऊक दर             किरकोळ दर 
कांदा             08-12                   25-30
बटाटा            08-14                  30-35
टोमॅटो            8-12                    40-45
भेंडी              25-30                   45-50
गवार             35-40                    60-65
मिरची            35-55                   60-70
कोथींबीर        10-12                   25-30
मेथी              07-19                   20-25 
मटार             55-60                   80-90

Web Title: Pune Lockdown : Prices increasing of fruits and vegetable after the announcement lockdown; Huge crowd of people for shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.