Pune Lok Sabha Result 2024: धंगेकरांच्या 'कसब्या'तही मोहोळांना लागली लॉटरी, ३७ हजारांची लीड काँग्रेस तोडेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:51 AM2024-06-04T11:51:36+5:302024-06-04T11:57:45+5:30

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे.....

Pune Lok Sabha 2024 after 6th round bjp ahead congress Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol | Pune Lok Sabha Result 2024: धंगेकरांच्या 'कसब्या'तही मोहोळांना लागली लॉटरी, ३७ हजारांची लीड काँग्रेस तोडेल का?

Pune Lok Sabha Result 2024: धंगेकरांच्या 'कसब्या'तही मोहोळांना लागली लॉटरी, ३७ हजारांची लीड काँग्रेस तोडेल का?

Pune Lok Sabha Result 2024| पुणे : चार फेऱ्यानंतर पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी (Murlidhar Mohol) २७ हजार ५९८ ची आघाडी घेतली होती. मोहोळांनी धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) कसबा मतदारसंघातून ५ हजार १३१ मतांची आघाडी घेतली होती. आतापर्यंत कसबा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना १७ हजार ७५१ मते तर रवींद्र धंगेकरांना १२ हजार ६२० मते मिळाली. तर पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली होते. आता सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ ३७ हजार ६९३ ने आघाडीवर आहेत.

चौथ्या फेरीत मुरलीधर मोहोळांना ८ हजार ६७५ मतांची लीड मिळाली. यामुळे मोहोळांनी चौथ्या फेरीअखेरीस एकूण २७ हजार ५९८ मतांची आघाडी घेतली आहे. मुरलीधर मोहोळ पाचव्या फेरीअखेरीस ३४ हजार ८५१ मतांनी पुढे आहेत. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली आहेत. तर सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ ३७ हजार ६९३ ने आघाडीवर आहेत.

चौथ्या फेरीत मिळालेले मतदान-

मतदारसंघ---मोहोळ---धंगेकर

वडगाव शेरी -  ७३६७  - ५१५३
शिवाजीनगर -२४५१  - २२६५
कोथरुड - ५३६४- २७५६
पर्वती - ६६२७- ३९१७ 
कॅन्टोनेंंट - १६३१ - ३२८२
कसबा - ५३६४ - २७५६
एकूण. -  २८८०४ -  २०१२९

पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात वडगाव शेरी २ लाख ४१ हजार ८१७, शिवाजीनगर १ लाख ४१ हजार ११३, कोथरूड २ लाख १७ हजार ४५५, पर्वती १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंट १ लाख ४९ हजार ९८४, तर कसबा मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदान झाले आहे.

यंदा ६८ हजार ४२२ मतदान अधिक-

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे.

Web Title: Pune Lok Sabha 2024 after 6th round bjp ahead congress Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.