Pune Lok Sabha Result : पुणे मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर; धंगेकर, मोरे पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:11 AM2024-06-04T08:11:51+5:302024-06-04T08:20:04+5:30

पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More)

Pune Lok Sabha 2024 Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant postal voting count | Pune Lok Sabha Result : पुणे मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर; धंगेकर, मोरे पिछाडीवर

Pune Lok Sabha Result : पुणे मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर; धंगेकर, मोरे पिछाडीवर

Pune Lok Sabha Result 2024| पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) मैदानात आहेत. सध्या पोस्टल मतदान मोजले जात आहे. या मोजणीत एनडीएचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलामध्ये मोहोळांनी आघाडी घेतली आहे तर धंगेकर आणि मोरे पिछाडीवर आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात वडगाव शेरी २ लाख ४१ हजार ८१७, शिवाजीनगर १ लाख ४१ हजार ११३, कोथरूड २ लाख १७ हजार ४५५, पर्वती १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंट १ लाख ४९ हजार ९८४, तर कसबा मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदान झाले आहे

यंदा ६८ हजार ४२२ मतदान अधिक

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे.

Web Title: Pune Lok Sabha 2024 Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant postal voting count

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.