पुणे लोकसभा निवडणूक : नेहमी देशासाठी उभा राहतो आज लोकशाहीसाठी उभा राहिलो 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 01:41 PM2019-04-23T13:41:23+5:302019-04-23T13:44:42+5:30

धानोरी भागात प्रमोद कदम हे जवान वॉकर घेऊन मतदान करण्यासाठी आले होते.

Pune Lok Sabha election: standing always for country but today standing democracy | पुणे लोकसभा निवडणूक : नेहमी देशासाठी उभा राहतो आज लोकशाहीसाठी उभा राहिलो 

पुणे लोकसभा निवडणूक : नेहमी देशासाठी उभा राहतो आज लोकशाहीसाठी उभा राहिलो 

Next
ठळक मुद्देलष्करात सेवेत असल्याने पुण्यात येऊन मतदान करणे त्यांना शक्य नसते. यंदा पायाचे ऑपरेशन  झाल्याने ते घरी असल्याने सकाळीच वॉकर घेऊन ते मतदान केंद्रावर हजर

पुणे : लोकसभेच्या तिसऱ्या  टप्यातील मतदान आज पार पडत आहे. पुणे, बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मतदान पार पडतंय. पुण्यात सकाळपासून नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी करत होते. धानोरी भागात प्रमोद कदम हे जवान वॉकर घेऊन मतदान करण्यासाठी आले होते. पायाला दुखापत झाल्याने सात दिवसांपूर्वी पायाचे ऑपरेशन झाले होते. नेहमी देशासाठी उभा असतो, आज लोकशाहीसाठी उभा आहे. चांगलं सरकार निवडण्यासाठी सर्वांनी मतदान केलं पाहिजे अशी भावना त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. 
आज पुणे लोकसभा मतदार संघासाठी मतदान पार पडत आहे. सकाळपासूनच पुणेकर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी करत आहेत. जेष्ठ नागरिक देखील आवर्जून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. पुण्यातील धानोरी भागात लष्करातील एक जवान वॉकर घेऊन मतदान करण्यासाठी आले होते. पायाला दुखापत झाल्याने त्यांचे काही दिवसांपूर्वी त्याचे ऑपरेशन झाले. गेली 21 वर्ष ते लष्करात देशाची सेवा करत आहेत. नेहमी बॅलेट पेपर ने ते मतदान करतात. लष्करात सेवेत असल्याने पुण्यात येऊन मतदान करणे त्यांना शक्य नसते. यंदा पायाचे ऑपरेशन  झाल्याने ते घरी असल्याने सकाळीच वॉकर घेऊन ते मतदान केंद्रावर हजर झाले. आज अनेक वर्षांनंतर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क त्यांनी बजावला.
 लोकमतशी बोलताना कदम म्हणाले, लष्करात सेवेत असल्याने मतदान केंद्रावर येऊन मतदान करता येत नाही. यंदा पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे घरी होतो. म्हणून मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. प्रत्यक्ष मतदान केल्याचा आज आनंद होतोय. काही लोक मतदान करत नाहीत. परंतु सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. चांगले सरकार निवडण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा.

Web Title: Pune Lok Sabha election: standing always for country but today standing democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.