पुणे लोकसभा निवडणूक : पुण्यात कलाकार व राजकीय मंडळीेनी मतदान करत बजावले राष्ट्रीय कर्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:15 AM2019-04-23T11:15:30+5:302019-04-23T11:24:21+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यांसाठी राज्यात मतदान होत असून पुण्यातही अनेक कलाकार मंडळींनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यांसाठी राज्यात मतदान होत असून पुण्यातही अनेक कलाकार मंडळींनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे ,अभिनेता सुबोध भावे, ज्येष्ठ सिने अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर, संध्या गोखले ,अभिनेत्री गौतमी देशपांडे, तुला पाहते रे फेम गौतमी दातार, सुयश टिळक, मेघराज राजे भोसले, ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे, शास्त्रीय गायक पं. राहुल देशपांडे यांसारख्या कलाकारांसह सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, मतदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे.
पुण्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मोहन जोशी व भाजपाचे गिरीश बापट यांच्या चुरशीची लढत होत आहे. या दोन्ही नेत्यांच्या समर्थनार्थ दिग्गज व स्टार प्रचारकांच्या नेत्यांनी सभा घेत लढतीत रंग भरला आहे. या दोन्ही नेत्यांनी घरोघरी जात प्रचार करण्यावर भर दिला असून आपपल्या विजयाची खात्रीही व्यक्त केली आहे.
शहरात सिनेकलाकार व राजकीय , प्रशासकीय मंडळींनी आपआपल्या जवळ्च्या मतदान केंद्रावर कुटुंबासह सकाळी मतदान आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. तसेच त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले. पुण्यात मतदानासाठी अनेक ठिकाणी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून येथे पोलीस , आरोग्य यांसह अनेक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आला आहे.
आज आम्ही पहाटे 4.30 वाजता मुंबईतून निघालो, पुण्यात पोचलो आणि मतदान केले. आता आपापल्या कामासाठी पुन्हा मुंबईला रवाना होणार आहे. तेव्हा सर्वांनी कोणतीही कारणे न देता मतदानासाठी बाहेर पडा आणि लोकशाहीचा उत्सव आपले अमूल्य मत देऊन साजरा करा.
- सुबोध आणि मंजिरी भावे
............
मी सकाळी ७.३० वाजताच सदाशिव पेठ येथे मतदान करून आले. सर्वांनी आवर्जून मतदान करायला जा. सोबत पिण्याच्या पाण्याची बाटली बाळगा, उन्हापासून शरीराचे संरक्षण व्हावे यासाठीही काळजी घ्या. अभिनेत्री गौतमी देशपांडे