Pune Lok Sabha Result 2024: मोहोळ आणि धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत; वसंत मोरे स्पर्धेपासून 'वंचित'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 02:12 PM2024-06-04T14:12:42+5:302024-06-04T14:12:59+5:30

Pune Lok Sabha Result 2024: वसंत मोरेंना या लढतीत आघाडी मिळवण्यासाठी लाखोंच्या फरकाने मत मिळवावी लागतील

Pune Lok Sabha Result 2024 A close fight between murlidhar mohol and ravindra Dhangekar Vasant More deprived of competition | Pune Lok Sabha Result 2024: मोहोळ आणि धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत; वसंत मोरे स्पर्धेपासून 'वंचित'

Pune Lok Sabha Result 2024: मोहोळ आणि धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत; वसंत मोरे स्पर्धेपासून 'वंचित'

Pune Lok Sabha Result 2024 : देशभरात निवडणूक निकालाची उत्सुकता लागली असून, पुणे जिल्ह्यात देखील ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने अंतिम फेरीनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ  (Murlidhar Mohol), महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर वंचित बहुजन आघडीकडून वसंत मोरे (vasant more) हे तिघे उमेदवार उभे राहिले आहेत. पुण्यात मोहोळ आणि धंगेकर यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आताही १० व्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. तर रवींद्र धंगेकर यांना आघडी मिळवण्यासाठी ६० हजार मतांची गरज आहे. अशातच तिसरे उमेदवार वसंत मोरे हे दोघांच्या स्पर्धेत अजिबात दिसत नसल्यचे स्पष्ट झाले आहे. 

मोरेंना ८ व्या फेरीनंतर १८ हजार मते मिळाली होती. त्यांना दोघांना गाठण्यासाठी लाखोंच्या फरकाने आघाडी घ्यावी लागेल. हे आता अशक्य असल्याचे दिसून आले आहे. प्रचाराच्या वेळी त्यांनी पुणेकर मलाच निवडून देतील असं भाकीत त्यांनी केलं होत. आता मात्र पुण्याच्या सहाही विधानसभा मतदार संघतून फक्त मोहोळ आणि धंगेकर यांची अटीतटीची लढत दिसून आली आहे. वसंत मोरे यांना  आठव्या फेरीनंतर १८ हजार ५३७ मते मिळाली आहेत. चार फेऱ्यानंतर पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी (Murlidhar Mohol) २७ हजार ५९८ ची आघाडी घेतली होती. मोहोळांनी धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) कसबा मतदारसंघातून ५ हजार १३१ मतांची आघाडी घेतली होती. आतापर्यंत कसबा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना १७ हजार ७५१ मते तर रवींद्र धंगेकरांना १२ हजार ६२० मते मिळाली. तर पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली होते. आता सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ ३७ हजार ६९३ ने आघाडीवर आहेत.  सातव्या फेरीनंतर मोहोळ यांना ४५ हजार ४१९ च्या फरकाने पुढे आहेत. तर आता आठव्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ हे तब्बल ४६  हजार ४६९ मतांनी आघाडीवर आहेत. या फेरीत १ हजार ५० चा लीड मोहोळ यांना मिळाला आहे.   

सातव्या फेरीत मिळालेले मतदान 

वडगाव शेरी - धंगेकर - ४९३७  - मोहोळ - ५२११
शिवाजीनगर -२७४४  - ३७०८
कोथरुड - ४२२०- ५९२५
पर्वती - ४७०९- ५२६७ 
कॅन्टोनेंंट - ४८०४ - ३८९७
कसबा - २६२७ - ५९३४
एकूण. -  २४०५१ -  ३०९४२
मोहोळ यांची एकूण आघाडी - ६८९१ (एकूण ४५४१९)

आठवी फेरीत मिळालेले मतदान 

वडगाव शेरी - धंगेकर - ४८७५  - मोहोळ - २९१५
शिवाजीनगर -२६३६  - १६६०
कोथरुड - ४५७४- ५२६५
पर्वती - ३२९८- ६००६ 
कॅन्टोनेंंट - २९५५ - ४६२९
कसबा - ४८९२ - ३५०५
एकूण. -  २२९३० -  २३९८०
मोहोळ यांची एकूण आघाडी - १०५० (एकूण ४६४६९)
 

Web Title: Pune Lok Sabha Result 2024 A close fight between murlidhar mohol and ravindra Dhangekar Vasant More deprived of competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.