Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात मुरलीधर मोहोळ तब्बल ४६ हजार मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:41 PM2024-06-04T13:41:45+5:302024-06-04T13:43:51+5:30
Pune Lok Sabha Result 2024रवींद्र धंगेकराना आघाडी घेण्यासाठी ४५ हजारांपेक्षा जास्त मत मिळवावी लागणार
Pune Lok Sabha Result 2024: देशभरात निवडणूक निकालाची उत्सुकता लागली असून, पुणे जिल्ह्यात देखील ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने अंतिम फेरीनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. चार फेऱ्यानंतर पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी (Murlidhar Mohol) २७ हजार ५९८ ची आघाडी घेतली होती. मोहोळांनी धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) कसबा मतदारसंघातून ५ हजार १३१ मतांची आघाडी घेतली होती. आतापर्यंत कसबा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना १७ हजार ७५१ मते तर रवींद्र धंगेकरांना १२ हजार ६२० मते मिळाली. तर पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली होते. आता सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ ३७ हजार ६९३ ने आघाडीवर आहेत. सातव्या फेरीनंतर मोहोळ यांना ४५ हजार ४१९ च्या फरकाने पुढे आहेत. तर आता आठव्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ हे तब्बल ४६ हजार ४६९ मतांनी आघाडीवर आहेत.
सातव्या फेरीत मिळालेले मतदान
वडगाव शेरी - धंगेकर - ४९३७ - मोहोळ - ५२११
शिवाजीनगर -२७४४ - ३७०८
कोथरुड - ४२२०- ५९२५
पर्वती - ४७०९- ५२६७
कॅन्टोनेंंट - ४८०४ - ३८९७
कसबा - २६२७ - ५९३४
एकूण. - २४०५१ - ३०९४२
मोहोळ यांची एकूण आघाडी - ६८९१ (एकूण ४५४१९)
आठवी फेरीत मिळालेले मतदान
वडगाव शेरी - धंगेकर - ४८७५ - मोहोळ - २९१५
शिवाजीनगर -२६३६ - १६६०
कोथरुड - ४५७४- ५२६५
पर्वती - ३२९८- ६००६
कॅन्टोनेंंट - २९५५ - ४६२९
कसबा - ४८९२ - ३५०५
एकूण. - २२९३० - २३९८०
मोहोळ यांची एकूण आघाडी - १०५० (एकूण ४६४६९)
पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात वडगाव शेरी २ लाख ४१ हजार ८१७, शिवाजीनगर १ लाख ४१ हजार ११३, कोथरूड २ लाख १७ हजार ४५५, पर्वती १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंट १ लाख ४९ हजार ९८४, तर कसबा मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदान झाले आहे.
यंदा ६८ हजार ४२२ मतदान अधिक-
पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे.
देशभरात निवडणूक निकालाची उत्सुकता लागली असून, पुणे जिल्ह्यात देखील ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाल्यानंतर दुपारी अडीचपर्यंत निकाल हाती येणार आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने अंतिम फेरीनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी (दि.४) होणार आहे. पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे, तर शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव (ता. शिरुर) येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामात आणि मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.