Pune Lok Sabha Result 2024:पुणेकरांनी हातात 'कमळ' धरले; लोकसभेच्या आखाड्यात मुरलीअण्णांनी धंगेकरांना चितपट केले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:58 PM2024-06-04T16:58:20+5:302024-06-04T17:00:33+5:30
Pune Lok Sabha Result 2024 पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ विजयी, रवींद्र धंगेकर ८० हजारांच्या फरकाने पराभूत
Pune Lok Sabha Result 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) मैदानात आहेत. त्यापैकी मोहोळ आणि धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याचे फिक्स झाले होते. चार फेऱ्यानंतर मोहोळ यांनी आघाडी घेतली. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यावर पुणे लोकसभेच्या आखाड्यात मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांना चितपट केले. सुरुवातीच्या कलामध्ये मोहोळांनी आघाडी घेतली आहे तर धंगेकर आणि मोरे पिछाडीवर आले. पुण्यात पुन्हा एकदा भाजपचे खासदार मोहोळ निवडून आले.
चार फेऱ्यानंतर पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी (Murlidhar Mohol) २७ हजार ५९८ ची आघाडी घेतली होती. मोहोळांनी धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) कसबा मतदारसंघातून ५ हजार १३१ मतांची आघाडी घेतली होती. कसबा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना १७ हजार ७५१ मते तर रवींद्र धंगेकरांना १२ हजार ६२० मते मिळाली. तर पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली होते. आता सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ ३७ हजार ६९३ ने आघाडीवर होते. सातव्या फेरीनंतर मोहोळ यांना ४५ हजार ४१९ च्या फरकाने पुढे होते. तर आता आठव्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ हे तब्बल ४६ हजार ४६९ मतांनी आघाडीवर होते. १० फेऱ्या झाल्यानंतर मोहोळ ५० हजांरांपेक्षा जास्त मताने लीडवर होते. ते लीड वाढता वाढता ७० हजारांच्या आसपास गेली. अखेर एवढा लीड तोडणे धंगेकरांसाठी आव्हानच होते. अखेर मुरलीधर मोहोळ ८१ हजार ०३७ मतांच्या फरकाने विजयी झाले.
पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात वडगाव शेरी २ लाख ४१ हजार ८१७, शिवाजीनगर १ लाख ४१ हजार ११३, कोथरूड २ लाख १७ हजार ४५५, पर्वती १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंट १ लाख ४९ हजार ९८४, तर कसबा मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदान झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे.