पुण्यातील कथितरीत्या बेपत्ता झालेली दोन कुटुंबं सापडली, मोबाईल बंद झाल्याने संपर्काबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 12:23 PM2018-08-23T12:23:34+5:302018-08-23T12:28:37+5:30
फिरायला गेलेली दोन कुटुंबं कथितरीत्या बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली. हडपसर येथे राहणारे मगर आणि सातव कुटुंब बेपत्ता झाले होते. मात्र, ही दोन्ही कुटुंबं सापडली असून सुखरुप असल्याची माहिती मिळते.
पुणे : फिरायला गेलेली दोन कुटुंबं कथितरीत्या बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली. हडपसर येथे राहणारे मगर आणि सातव कुटुंब बेपत्ता झाले होते. मात्र, ही दोन्ही कुटुंबं सापडली असून सुखरुप असल्याची माहिती मिळते.
सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि त्यांचे मित्र जगन्नाथ हरी सातव हे दोघे आपल्या कुटुंबीयांसमवेत मंगळवारी खडकवासला, पानशेतला फिरायला गेले आहे. त्यांनी खडकवासलापासून चार- पाच किलोमीटरवर असलेल्या अॅक्वेरियस हॉटेलात मुक्काम केला. मात्र, बुधवार (दि.22) सकाळपासून त्यातील 5 जणांचे फोन बंद आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता दोन्ही कुटुंबं सापडली असून सुखरुप आहेत. ज्या ठिकाणी फिरायला गेले होते. त्याठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नव्हते. त्यामुळे मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते.
सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव दोघांचा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.