पुणे : मिनाक्षी फेरो कंपनीत भीषण स्फोट, 10-12 कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 09:55 AM2018-01-31T09:55:22+5:302018-01-31T09:56:41+5:30
भांडगाव (ता.दौंड) येथील मिनाक्षी फेरो कंपनीत भीषण स्फोट होऊन १० ते १२ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
यवत - भांडगाव (ता.दौंड) येथील मिनाक्षी फेरो कंपनीत भीषण स्फोट होऊन १० ते १२ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास सदर स्फोट झाला. मिनाक्षी फेरो कंपनी पुणे-सोलापूर महामार्गापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर भांडगाव- खोर रस्त्यालगत आहे.
कंपनीत भंगार लोखंड वितळवून पक्के लोखंड तयार करण्यासाठी कच्चा माल बनविण्याचे काम केले जाते. सदर कंपनीत परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. स्थानिक कामगार येथे क्वचितच कामाला आहेत.
हा स्फोट प्रचंड मोठा होता. अजूनही कंपनीत गॅस सिलिंडर असल्याने स्फोट होण्याची शक्यता असल्याने भांडगाव मधील नागरिक भयभीत होते. लोखंड वितळविण्यासाठी असलेल्या भट्टी नजीक सदर स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.