अखेर पोलिसांची माघार! अफजलखानाचा वध देखावा सादर करण्यास पुण्यातील 'त्या' मंडळाला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:11 PM2022-08-24T17:11:03+5:302022-08-24T17:11:34+5:30

शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते

Pune mandal allowed to perform Afzal Khan killing scene police | अखेर पोलिसांची माघार! अफजलखानाचा वध देखावा सादर करण्यास पुण्यातील 'त्या' मंडळाला परवानगी

अखेर पोलिसांची माघार! अफजलखानाचा वध देखावा सादर करण्यास पुण्यातील 'त्या' मंडळाला परवानगी

googlenewsNext

पुणे : कोथरूड भागातील संगम तरुण मंडळाला अफजल खानचा वध या विषयावरील जिवंत देखावा दाखविण्यास कोथरुड पोलिसांनी परवानगी नाकारली होती. शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यावरून यावेळी शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवायला पाकिस्तानात जायचं का? असा सवाल मंडळाने उपस्थित केला. तर आम्ही भूमिकेवर ठाम असून देखावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच मंडळाने आंदोलनाचा इशाराही दिला होता. पण अखेर अफजल खानाचा वध हा देखावा सादर करण्यास कोथरुड पोलीस ठाण्याकडून परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाचा अनुषंगाने दिलेल्या परवानगीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या. असे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी मंडळाला पत्राद्वारे कळवले आहे. 

कोथरूड येथील संगम तरुण मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगावर आधारित देखावा सादर होतो. या वेळी मंडळाने गणेशोत्सवासाठी अफजलखानाचा वध या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र कोथरूड पोलिसांना पाठविले होते. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत चर्चेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र संबंधित मंडळाला पाठविले होते. 

काय म्हणाले होते मंडळाचे कार्याध्यक्ष 

संगम तरुण मंडळाला यंदा ५६ वर्ष पूर्ण होतील. गेले पंचवीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करत आलो आहोत. शिवाजी महराज यांचा राज्यभिषेक, गड आला पण सिंह गेला, पावनखिंड लढाई, शाहिस्तेखानाची बोटं कापले, आग्र्याहून सुटका असे विविध देखावे सादर केले आहेत. यंदा अफजलखानाचा वध देखावा सादर करायचा होता. त्याच्या परवानगीसाठी आम्ही पोलिसांकडे गेलो होतो. त्याबाबतीत आम्ही पोलिसांना रीतसर पत्र पण दिलं होतं. तेव्हा ते काही बोलले नाहीत. मात्र नंतर त्यांचं पात्र आम्हाला प्राप्त झालं. त्यात लिहिलं होतं की, 'जातीय तेढ निर्माण होईल म्हणून आम्ही तुम्हाला परवानगी नाकारतोय.' आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही देखावा करणार. आपण रोज घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे फकत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे. मग या शिवाजी महाराज यांचा इतिहास जर आम्ही हिंदुस्थानात दाखवायचं नाहीतर तो दाखवायला काय आम्ही पाकिस्तानात जायचं का? इतिहास नाकारता येणार आहे का...? पोलीस म्हणतात वरून आदेश आहे, हे वरून आदेश नेमके कोणाचे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. 

Web Title: Pune mandal allowed to perform Afzal Khan killing scene police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.