Pune: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, नातेवाईक संतप्त; पतीसह तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 02:03 PM2024-04-04T14:03:08+5:302024-04-04T14:03:27+5:30

वेल्हे ( पुणे ) : वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

Pune: Married woman commits suicide due to in-law's torture, relatives angry; Crime against three including husband | Pune: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, नातेवाईक संतप्त; पतीसह तिघांवर गुन्हा

Pune: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, नातेवाईक संतप्त; पतीसह तिघांवर गुन्हा

वेल्हे (पुणे) : वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करिष्मा आकाश राऊत (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त माहेरच्या नातेवाइकांनी मयत करिष्मा हिचे पार्थिव ॲम्बुलन्ससह वेल्हे पोलिस स्टेशन आवारात नेऊन संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. यामुळे वेल्हे पोलिस स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत मयत करिष्मा हिचे वडील शंकर नारायण शेडगे (रा. धामनओहळ, ता. मुळशी, सध्या रा. धायरी गाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शंकर शेडगे यांची लहान मुलगी मयत करिष्मा आणि आकाश जयराम राऊत (रा. वेल्हे बुद्रुक, ता. राजगड) यांचा २२ फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पाहिले ५ महिने सर्व सुरळीत चालले होते. त्यानंतर पती आकाशने तसेच सासरे जयराम रघुनाथ राऊत आणि सासू आशा जयराम राऊत यांनी मयत करिष्मा हिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच माहेरच्यांशी फोनवर बोलण्यास सुद्धा बंदी घातली. फोनवर बोलणे होत नसल्याने वडील शंकर शेडगे हे वेल्हे बुद्रुक येथील घरी करिष्माला भेटायला गेले असता, तुम्ही तिला भेटायला यायचे नाही, असे आकाशने फिर्यादी शेडगे यांना सुनावले.

यानंतर करिष्माने पुढील काही महिने असेच दबावाखाली काढले. त्यानंतर काही महिन्यांनी करिष्मा या गरोदर राहिल्या. शेडगे यांनी खूप वेळा राऊत कुटुंबीयांना करिष्मा हिचे डोहाळे जेवण घालण्यासाठी तिला घरी पाठविण्याची विनवणी केली. परंतु राऊत कुटुंबीयांनी त्यास नकार दिला आणि प्रसूती होण्याच्या ३ ते ४ दिवस अगोदर करिष्मास घरी पाठविले. २६ जून २०२३ रोजी करिष्मास मुलगी झाली. बाळंत झाल्याच्या पाचव्या दिवशी आकाशने शेडगे यांना फोन करून करिश्मास आहे त्या अवस्थेत सासरी पाठवून देण्यास सांगितले. तिची सध्या उठ-बस करण्याची परिस्थिती नसल्याने तिला महिना-पंधरा दिवस माहेरी राहू द्या, असे शेडगे यांनी म्हटल्याने आकाशने त्यांच्याशी फोनवर शाब्दिक वाद घातला. त्यानंतर नाईलाजास्तव शेडगे यांनी करिष्मास माहेरी सोडले.

त्यांनंतरही राऊत कुटुंबीयांनी करिष्मावरील अत्याचार थांबविले नाहीत. अखेर रविवारी (दि. ३१ मार्च २०२४) करिष्मा हिने सासरच्या जाचाला कंटाळून सासरच्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. २) उपचारादरम्यान रात्री ८ वाजता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. संतप्त नातेवाइकांनी बुधवारी (दि. ३) दुपारी भारती हॉस्पिटल येथून ॲम्बुलन्सद्वारे पार्थिव थेट वेल्हे पोलिस स्टेशन आवारात आणून करिष्मास न्याय मिळावा यासाठी दोषींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. वेल्हे पोलिसांनी त्वरित या घटनेची दखल घेत पती आकाश राऊत, सासरे जयराम राऊत आणि सासू आशा राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलिस करीत आहेत.

Web Title: Pune: Married woman commits suicide due to in-law's torture, relatives angry; Crime against three including husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.