Pune Mayor Corona Positive: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 01:44 PM2022-01-27T13:44:48+5:302022-01-27T13:46:50+5:30
माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन मोहोळ यांनी केले
पुणे : देशात तिसऱ्या लाटेत अनके जणांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. या लाटेतील विषाणू घातक नसला तरी तो वेगाने पसरू लागला आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही पुन्हा कोरोना होऊ लागला आहे. दोन डोस घेतल्यामुळे सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यातच पुण्यातही १ जानेवारीपासून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. त्यातच आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. लक्षणे जाणवत असल्याने टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.
महापौर म्हणाले, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेन. अशी माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे.
कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 27, 2022
आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर
महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना झाला होता. त्यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेतले होते. आता पुन्हा त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचे त्यांनी टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.