पुणे मेट्रोला वादाचे ग्रहण

By admin | Published: May 2, 2015 05:31 AM2015-05-02T05:31:19+5:302015-05-02T05:31:19+5:30

गेल्या चार वर्षांपासून केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या मान्यतांच्या फेऱ्यामध्ये अडकलेली पुणे मेट्रो आता मान्यतेच्या अंतिम टप्प्यात वादाच्या ग्रहणात सापडली आहे

Pune metro episode | पुणे मेट्रोला वादाचे ग्रहण

पुणे मेट्रोला वादाचे ग्रहण

Next

पुणे : गेल्या चार वर्षांपासून केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या मान्यतांच्या फेऱ्यामध्ये अडकलेली पुणे मेट्रो आता मान्यतेच्या अंतिम टप्प्यात वादाच्या ग्रहणात सापडली आहे. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर तत्काळ पुणे मेट्रोचे मार्गी लावण्याचे केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने दिलेले आश्वासन आघाडी सरकारप्रमाणेच राजकीय इच्छाशक्तीअभावी पुन्हा रखडला आहे. तर या वादामुळे
नोव्हेंबर २०१४ पासून एप्रिल २०१५ अखेरपर्यंत या प्रकल्पाची किंमत दररोज दोन कोटी रुपयांनी वाढत असून, तो जवळपास ४०० कोटींनी वाढला आहे.
२०१४ च्या सुरुवातीलाच केंद्रात आणि राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने भाजपकडून सत्तेत आल्यास
पुणे मेट्रो मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, सत्ताबदल
होताच या प्रकल्पाला वादाचे
ग्रहण लागले. (प्रतिनिधी)

Web Title: Pune metro episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.