Pune Metro: मेट्रोची सुरक्षा कुचकामी; आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, मेट्रोला आली उशिरा जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:32 IST2025-03-12T17:32:12+5:302025-03-12T17:32:55+5:30

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मेट्रोकडून सुरक्षारक्षक वाढविण्यात येणार, मेट्रोचा दावा

Pune Metro: Metro security ineffective; Protests raise concerns about passenger safety, Metro wakes up late | Pune Metro: मेट्रोची सुरक्षा कुचकामी; आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, मेट्रोला आली उशिरा जाग

Pune Metro: मेट्रोची सुरक्षा कुचकामी; आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, मेट्रोला आली उशिरा जाग

पुणे : मेट्रोला दिवसेंदिवस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु रविवारी आंदोलकांनी मेट्रो स्थानकाची सुरक्षा भेदत घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे मेट्रोच्या सुरक्षा किती कुचकामी आहे, हे दिसून आले. परंतु यापुढे अशा घटना होऊ नये, यासाठी मेट्रोकडून सुरक्षरक्षक, सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखभालीवर भर देण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडीमुळे सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी पुणेकरप्रवासी मेट्रोला प्राधान्य देत आहेत. परंतु कोणत्याही वाहनांमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास बंदी आहे. असे असताना आंदोलक मेट्रोची सुरक्षा भेदून मेट्रो स्थानकावर घेऊन गेले. यामुळे कोणत्याही प्रकारचे अघटित घटना घडली तर याला जबाबदार कोण? प्रवाशांच्या जीवाला धाेका झाले कोणाला दोषी द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय अशा प्रकारे घटना घडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामेट्रोने पुण्यातील भुयारी मेट्रो स्थानकात पीएसजी यंत्रणा बसविली आहे. परंतु उन्नत मेट्रो स्थानकावर पीएसजी यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. या यंत्रणेचे दरवाजे मेट्रो ट्रेनच्या दरवाजांशी समांतर उघडतात आणि बंद होतात, अशी ही पीएसजी यंत्रणा आहे. त्याचा परिणाम अपघात आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार होती. परंतु ही सुविधा उन्नत मार्गावर नसल्याने आंदोलकांना गोंधळ घालण्यास सोपे गेले. पण प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षेचा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे.

दिल्ली, मुंबईत पीएसजी यंत्रणा 

महामेट्रोने पीएसजी यंत्रणा बसविण्याचे ठरविले होते. त्यासाठी खर्चाची तरतूद देखील केली होती. परंतु नंतरच्या काळात खर्चामुळे याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु दिल्ली आणि मुंबई मेट्रोमध्ये अशा प्रकारची यंत्रणा सुरू आहे. त्याचा फायदा झाला आहे. असे असताना पुण्यात महामेट्रोने ही यंत्रणा बसविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पीएसजी यंत्रणा असती तर रविवारी थेट रुळावर जाऊन आंदोलन केल्याची घटना टळली असती.

सुरक्षा यंत्रणेवर भर देणार 

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मेट्रोकडून सुरक्षारक्षक वाढविण्यात येणार आहे. शिवाय सीसीटीव्ही यंत्रणेवरुन सातत्याने मेट्रो स्थानकावरील देखरेख वाढविण्यात येणार आहे. तसेच सातत्याने तपासणीवर भर देण्यात आहे. शिवाय संशयास्पद हालचालीवर लक्ष देण्यात आहे.

मेट्रो स्थानकावर कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षारक्षक, वाढिवण्यात येणार आहे. शिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून सातत्याने देखरेखीवर भर दिला जाणार असून, तपासणीवर लक्ष देण्यात येणार आहे. -हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

 

Web Title: Pune Metro: Metro security ineffective; Protests raise concerns about passenger safety, Metro wakes up late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.