Pune: वारजेमध्ये मध्यरात्री थरार, पोलीस आणि दरोडखोरांमध्ये गोळीबार, एक पोलीस जखमी

By विवेक भुसे | Published: July 8, 2023 08:59 AM2023-07-08T08:59:38+5:302023-07-08T09:00:33+5:30

Pune Crime: पुणे शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असताना वारजेत कॉम्बिंग ऑपरेशन करणार्‍या गुन्हे शाखेच्या पथकावर ८ ते १० जणांच्या दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिसांनीही दरोडेखोरांवर गोळीबार केला.

Pune: Midnight tension in Warje, shootout between police and robbers, one policeman injured | Pune: वारजेमध्ये मध्यरात्री थरार, पोलीस आणि दरोडखोरांमध्ये गोळीबार, एक पोलीस जखमी

Pune: वारजेमध्ये मध्यरात्री थरार, पोलीस आणि दरोडखोरांमध्ये गोळीबार, एक पोलीस जखमी

googlenewsNext

- विवेक भुसे 
पुणे : शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असताना वारजेत कॉम्बिंग ऑपरेशन करणार्‍या गुन्हे शाखेच्या पथकावर ८ ते १० जणांच्या दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिसांनीही दरोडेखोरांवर गोळीबार केला. स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत हे दरोडेखोर होते. ही घटना वारजे येथील रोजरी स्कुलजवळील म्हाडा वसातीमध्ये मध्यरात्री एक वाजता घडली. या घटनेत पोलीस कर्मचारी कट्टे हे जखमी झाले  आहेत. पोलिसांनी ५ जणांना पकडले आहे.

शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री संपूर्ण शहरात नाकाबंदी केली होती. या वेळी गुन्हे शाखेचे युनिट ३ चे पथक सहायक पोलीस आयुक्त अमोल तांबे, पोलीस निरीक्षक बहिरट, पोलीस उपनिरीक पवार व त्यांचे सहकार्‍यांनी वारजे  येथील म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिग ऑपरेशन राबवत होते. यावेळी रोझरी स्कुलजवळ ८ ते १० जणाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्यांच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्यातील एकाने पिस्तुल काढून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीही गोळीबार केला. यावेळी झटापटीमध्ये एका चोरट्याने पोलिसांच्या दिशेने कोयता फेकून मारला. तो पोलीस कर्मचारी कट्टे यांना लावून ते जखमी झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यातील ५ जणांना पकडले. इतर जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्या ५ जणांकडून एक गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुसे, कोयते, कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, हातोडा असा माल जप्त केला आहे.

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याच्या तयारीत हे दरोडेखोर होते. हे दरोडेखोर सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Web Title: Pune: Midnight tension in Warje, shootout between police and robbers, one policeman injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.