पुणे मिरज एक्सप्रेस आता नीरेत थांबणार; रेल्वे रुळावर न उतरता हे आंदोलन यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2023 02:20 PM2023-06-06T14:20:35+5:302023-06-06T14:20:55+5:30

रेल रोको आंदोलनाचा इशार दिल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता

Pune Miraj Express will now halt at Neera This movement was successful without coming down on the railway track | पुणे मिरज एक्सप्रेस आता नीरेत थांबणार; रेल्वे रुळावर न उतरता हे आंदोलन यशस्वी

पुणे मिरज एक्सप्रेस आता नीरेत थांबणार; रेल्वे रुळावर न उतरता हे आंदोलन यशस्वी

googlenewsNext

नीरा : नव्याने सुरू होणाऱ्या पुणे मिरज सुपरफास्ट एक्सप्रेसला नीरा येथे थांबा न दिल्याने नीरेकर ग्रामस्थांनी रेल रोकेचा इशारा दिला होता. मंगळवारी या आंदोलनाला नीरा ग्रामस्थांनी मोठ्यासंखेने प्रतिसाद दिला. रेल्वे रुळावर न उतरता हे आंदोलन यशस्वी करण्यात आंदोलकांना यश आले. 

 रविवारी (दि.०४) नीरा येथील ग्रा. पं. सदस्य व नीरा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रमोद काकडे, बाळासाहेब साळुंखे, अमीर मणेर, सामाजिक कार्यकर्ते टी. के. जगताप, सुधीर शहा, सचिन ‍ मोरे, संतोष मोहिते आदींनी नीरा रेल्वे स्टेशनचे प्रमुख महेश मिना यांना विविध समस्यांबाबत निवेदन दिले होते. सोमवारी पुणे रेल्वे डिव्हजनलचे अप्पर रेल प्रबंधक बी. के. सिंग व काही अधिकाऱ्यांनी प्रमुख आंदोलकाशी चर्चा करत सकारत्मकता दर्शवली होती. पुढील आठवड्यापासून ही नवी गाडी नीरा स्टेशनवर थांबण्याचा आश्वासन दिले होते. आज मंगळवार रेल्वे अधिकारी सिंग यांच्या सुचनेनुसार काही काळा ही सुपरफास्ट रेल्वे गाडी थांबवण्यात आली. रेल्वे चालकांचा आंदोलकांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या दरम्यान पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.          

दर मंगळवारी धावणारी पुणे - मिरज व मिरज - पुणे या साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसला नीरेत थांबा दिला नव्हता. त्यागाडीला थांबा मिळावा, जोपर्यंत २ नंबरचा प्लॅटफॉर्मचे काम होत नाही. तोपर्यंत पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या जुन्या १ नंबरच्या प्लॉटफॉर्मला थांबवाव्यात. नीरा रेल्वे स्थानकातून निजामुद्दीन - वास्को ही गोवा एक्स्प्रेस, मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, यशवंतपूर बंगलोर संपर्क क्रांती एक्स्प्रेस, चंदिगढ - यशवंतपूर ही चंदिगढ एक्स्प्रेस, बंगलोर - अजमेर एक्स्प्रेस, कोल्हापूर - अहमदाबाद या लांब पल्ल्याच्या गाड्या ये - जा करीत असतात. मात्र या गाड्यांना पुणे रेल्वे स्थानकानंतर थेट सातारा रेल्वे स्थानकांवरच थांबा आहे. यापैकी काही गाड्या नीरा स्टेशनला थांबवाव्यात असे निवेदनात म्हटले होते. मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

रेल रोको आंदोलनाचा इशार दिल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी जीआरपी पोलीस उपाधिक्षक महेश देवीकर व आरपीएफचे निरिक्षक अजित मान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रेल्वे पोलीसचे २०, महिला ५ महिला, आरपीफचे २ निरिक्षक, ३ उपनिरीक्षक व १६ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. 

"मंगळवारी (दि.०६ ) नव्याने सुरु होणाऱ्या पुणे - मिरज सुपरफास्ट एकस्प्रेस समोर रेल रोको करणार असल्याचा इशारा दिला होते. या आंदोलनाला नीरा ग्रामस्थांनी मोठ्यासंखेने प्रतिसाद दिला. पुणे रेल्वे डिव्हजनलचे अप्पर रेल प्रबंधक बी. के. सिंग यांनी आमच्या आंदोलनाला सकारात्मकता दर्शवत साप्ताहिक गाडी थांवण्याचे तोंडी आश्वासन दिले. एकाही आंदोलक रेल्वे रुळावर न उतरता हे आंदोलन यश्स्वी करण्यात आम्हाला यश आले."

Web Title: Pune Miraj Express will now halt at Neera This movement was successful without coming down on the railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.