खडकवासला धरण पुनरुज्जीवनाचे पुणे मॉडेल

By admin | Published: July 6, 2015 05:50 AM2015-07-06T05:50:17+5:302015-07-06T05:50:17+5:30

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचे पुनरुज्जीवन करण्याची लोकचळवळ ग्रीन थंब व श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या पुढाकाराने सुरू आहे.

Pune model of Khadakvasla dam reunion | खडकवासला धरण पुनरुज्जीवनाचे पुणे मॉडेल

खडकवासला धरण पुनरुज्जीवनाचे पुणे मॉडेल

Next

हणमंत पाटील, पुणे
शहरातील पाणीपुरवठ्याचा तुटवडा संपविण्यासाठी नवीन धरण बांधणे अशक्य आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचे पुनरुज्जीवन करण्याची लोकचळवळ ग्रीन थंब व श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या पुढाकाराने सुरू आहे. गेल्या महिन्यात धरणातील १ लाख डंपर गाळ काढून तेवढीच पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. सुमारे ३०० गणेश मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सुरू असलेल्या या ‘जय गणेश जलसंवर्धन अभियाना’चे पुणे मॉडेल राज्यभर राबविण्याची आवश्यकता आहे.
महात्मा जोतिबा फुले यांनी जुन्या पुण्यासाठी १८७९ मध्ये खडकवासला धरण बांधले. त्या वेळी पुण्याची लोकसंख्या एक लाखापर्यंत होती. या धरणाची पाणी साठवण क्षमता चार टीएमसी होती. मात्र, त्यानंतर १९६१ ला पानशेत धरण फुटल्यानंतर गाळ खडकवासला धरणात साठत गेला. सद्य:स्थितीत पुण्याची लोकसंख्या सुमारे ४५ लाख इतकी असून, खडकवासला धरणाची पाणी क्षमता गाळामुळे ६० टक्के कमी होऊन १.७५ टीएमसी झाली आहे. दरवर्षी वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना महापालिका व पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाची दमछाक होत आहे. ग्रीन थंबचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांनी महात्मा फुले पाणी चळवळ अभियानांतर्गत खडकवासलामधून लोकसहभागाद्वारे गाळ काढण्याचे अभियान २०१२ ला
सुरू केले. दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या पुढाकाराने पुण्याच्या ३०० गणेश मंडळांची साथ मिळाली. मृदू, जल व वृक्षसंवर्धनाचे पुणे मॉडेल राज्यभर राबविण्याची आवश्यकता आहे, असे अपेक्षा चळवळीचे समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
------
अनेक वर्षांनंतर खडकवासला धरणाच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीसाठी शहरातील सुमारे ३०० गणेश मंडळांचे कार्यकर्ते संघटित होऊन सक्रिय झाले आहेत. जय गणेश जलसंवर्धन अभियानासाठी गणेश मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात शिरीष मोहिते, उदय जगताप, दत्तात्रय देवकर, डॉ. विजय पोटफोडे, पराग ठाकूर, आनंद सराफ, पियुष शहा, विनायक घाटे, सुनील घाडगे व सुनील रासने यांचा समावेश आहे. आता लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या उपक्रमात सहभागी होऊन धरण पुनरुज्जीवनाची पुणे मॉडेलची राज्यभर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा महेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

Web Title: Pune model of Khadakvasla dam reunion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.