पुणे : नाताळसाठी एसटीच्या 50 जादा गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 08:12 AM2017-12-24T08:12:18+5:302017-12-24T08:12:41+5:30
नाताळच्या सुटीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातून 50 जादा गाड्या सोडल्या आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट आणि वाकड-हिंजवडी येथून या विशेष गाड्या सुरू राहणार असल्याचे एसटीचे पुणे विभागीय वाहतूक नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
पुणे : नाताळच्या सुटीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातून ५० जादा गाड्या सोडल्या आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट आणि वाकड-हिंजवडी येथून या विशेष गाड्या सुरू राहणार असल्याचे एसटीचे पुणे विभागीय वाहतूक नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
नाताळनिमित्त काही शाळांना पाच ते दहा दिवस सुटी लागली आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस जोडून सुटी आल्याने अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले आहे. तसेच, पुणे शहर व परिसरात राहणा-या अनेक नागरिकांनी सहकुटुंब बाहेरगावी सुटीचा आनंद लुटण्यासाठी काही दिवस आधीच एसटीचे बुकिंग करून ठेवले आहे. पुण्याबाहेर जाणा-यांची संख्या मोठी असून पुण्यात येणाºयांची संख्या तेवढीच आहे. त्यामुळे शहराला जोडणाºया महामार्गावर कमीअधिक प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागीय एसटी महामंडळाने शहरातून ५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. शिवाजीनगर येथून पणजीसाठी ३ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच, वाहतूककोंडी होत असल्याने काही गाड्या नियोजित वेळेत निश्चित ठिकाणी पोहोचत नसल्याचे एसटीच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
एसटीचे विभागीय वाहतूक नियंत्रक श्रीनिवास जोशी म्हणाले, ‘‘शिवाजीनरग बस स्थानकावरून २२ जादा गाड्या सोडल्या आहेत. तर, स्वारगेट येथून कोल्हापूर, सातारा, मुंबई, ठाणे येथे जाणा-या गाड्या सोडल्या जात आहेत. वाकड-हिंजवडी येथे शुक्रवारी १० रिकाम्या गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. त्या विविध मार्गांवर धावणार आहेत. त्याचप्रमाणे सुटीच्या कालावधीत १७ शिवशाही बस सोडल्या जाणार असून, त्याबाबतचे नियोजन केले जात आहे.’’
तिकिटासाठी रांगाच रांगा
शिवाजीनगर व स्वारगेट या बस स्थानकांवर शनिवारी दुपारनंतर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांनी बस स्थानकावर मोठ्या रांगा लावल्या होत्या. या रांगा स्थानकापासून रस्त्यापर्यंत बाहेर आल्या होत्या. पुणे विभागाकडून अधिक गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, स्थानकातून सोडण्यात आलेल्या गाड्यांच्या तुलनेत प्रवाशांची संख्या अधिक असल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.