पुणे-मुंबई रेल्वे मार्ग पूर्ववत, अप लाईन झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:12 AM2021-07-27T04:12:13+5:302021-07-27T04:12:13+5:30
पुणे : पुणे-मुंबई रेल्वे मार्ग सोमवारी पूर्ववत करण्यात आला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून दरड कोसळल्याने बंद झालेली अप ...
पुणे : पुणे-मुंबई रेल्वे मार्ग सोमवारी पूर्ववत करण्यात आला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून दरड कोसळल्याने बंद झालेली अप मार्गिका सोमवारी दुरुस्त करून पूर्ववत केली. त्यामुळे आता घाटात तिन्ही मार्गिकांवरून रेल्वे वाहतूक होईल.
रविवारी रात्री आठ वाजता अप लाईन फिट झाली. मग त्यावरून पहिल्यांदा मालगाडी सोडण्यात आली. प्रवासी गाड्याची वाहतूक सकाळी आठ वाजता सुरू झाली. बुधवारी दरड कोसळून लोणावळा-कर्जत सेक्शनमध्ये रेल्वे सेवा पूर्ण पणे बंद करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून मिडल व डाऊन अशा दोन्ही मार्गिका अवघ्या २२ तासांत सुरू केल्या. मात्र, अप लाईनचे मोठे नुकसान झाल्याने हा मार्ग सुरू करण्यास थोडा अधिक कालावधी लागला. रेल्वे प्रशासनाने हे काम करताना काही गाड्या रद्द केल्या. तर घाट सेक्शनमध्ये वेग मर्यादा (कॉशन ऑर्डर ) लावून गाड्याची वाहतूक सुरू ठेवली. त्यामुळे मुंबईहून पुण्याला येणाऱ्या गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिरा धावल्या.