'युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास' नंतरच करता येणार रेल्वे प्रवास :जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:40 PM2021-08-17T19:40:12+5:302021-08-17T19:43:34+5:30

"युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास" असे प्रमाणपत्र दिल्यानंतरच रेल्वे प्रवास करता येणार; प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र मदत कक्ष 

Pune-Mumbai train journey can be done only after Tehsildar's 'Universal Travels Pass': Dr. Rajesh Deshmukh | 'युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास' नंतरच करता येणार रेल्वे प्रवास :जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आदेश

'युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास' नंतरच करता येणार रेल्वे प्रवास :जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आदेश

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात लोकल रेल्वे अथवा पुणे- मुंबई रेल्वे प्रवास करण्यासाठी आता तहसिलदार संबंधित व्यक्तीने कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवसपूर्ण केले असल्याची खात्री करून "युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास" असे प्रमाणपत्र दिल्यानंतरच रेल्वे प्रवास करता येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसिलदार यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले असून यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील संबंधित तहसिलदार यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात येत आहे. ल्याया नोडल अधिकारी यांनी आपले कार्यक्षेत्रातील संबंधित रेल्वे विभाग प्रमुख यांचेशी समन्वय साधून रेल्वे प्रवासास देण्याकामी मदत केंद्र स्थापन करावे व आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपले स्तरावरून करणेत यावी.

मदत केंद्र स्थापन केल्यानंतर  मदत केंद्रावरील कर्मचारी यांनी कोविड डोस घेतल्याबाबतच्या प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करुन सदर प्रमाणपत्र लस धारण करणाऱ्या व्यक्तीचे असल्याबाबत खात्री करावी. तसेच त्यांनी दिलेले कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी उदा. कागदपत्रावरील नावे, दोन्ही लसीच्या तारखा दुसरी लस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले आहे याबाबत व इतर बाबींची पडताळणी करून सत्यता असल्यास लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर तसेच आयकार्डच्या छायांकीत प्रतीवर "युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास" असे प्रमाणपत्र द्यावे. या प्रमाणपत्राच्या आधारेच संबंधित प्रवाशास रेल्वे तिकीट काउंटरवर रेल्वे कर्मचारी मार्फत मासिक टिकीट अथवा पास देण्यात येणार आहे.

Web Title: Pune-Mumbai train journey can be done only after Tehsildar's 'Universal Travels Pass': Dr. Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.