पुणे महापालिका आयुक्तपदी डॉ. राजेद्र भोसले; विक्रम कुमार यांची बदली
By राजू हिंगे | Published: March 15, 2024 07:05 PM2024-03-15T19:05:26+5:302024-03-15T19:22:42+5:30
डॉ. राजेंद्र भोसले हे मुंबई उपनगर येथे जिल्हाधिकारी होते
पुणे: पुणे महापालिकेेचे आयुक्त विक्रम कुमार यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विक्रम कुमार यांची एमएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पदांवरील अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या आहेत .त्यात पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावरून विक्रम कुमार यांची बदली करण्यात आले. डॉ. राजेद्र भोसले यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार यांची एमएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे २००४च्या बँचचे अधिकारी आहेत. डॉ. राजेंद्र भोसले हे मुंबई उपनगर येथे जिल्हाधिकारी होते. त्यापुर्वी भोसले यांनी नगर येथे जिल्हाधिकारी म्हणुन काम केले आहे. भोसले यांनी नगर जिल्ह्यात महसूल विभागाचे डिजिटल उतारे देण्याचा निर्णय घेतला होता. भोसले यांच्या कार्यकाळात नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. भोसले यांचा सप्तपदी अभियानाचा उपक्रम राज्यभर गाजला.