PMC: पुणे महापालिका आयुक्तांना डेंग्युसदृश्य लक्षणे; प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह

By राजू हिंगे | Published: July 18, 2024 07:03 PM2024-07-18T19:03:36+5:302024-07-18T19:59:07+5:30

पुणे शहरात डेंग्युच्या रूग्णाची संख्या वाढत असताना पुणे महाापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना डेग्युसदृश्य लक्षणे आढळली

Pune Municipal Commissioner rajendra bhosale dengue like symptoms Preliminary test report negative | PMC: पुणे महापालिका आयुक्तांना डेंग्युसदृश्य लक्षणे; प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह

PMC: पुणे महापालिका आयुक्तांना डेंग्युसदृश्य लक्षणे; प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह

पुणे: पुणे महापालिकेचे आयुक्त डॅा. राजेंद्र भोसले यांना डेंग्युसदृश्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र आयुक्तांच्या डेंग्युच्या केलेल्या प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

शहरात दरवर्षी पावसाळामध्ये डेंग्यूचा उद्रेक मोठया प्रमाणात होतो. यंदाही डेंग्यूच्या रूग्णाची संख्या वाढतच आहे. डासाची उत्पतीच्या ठिकाणाचा शोध घेवुन महापालिका औषध फवारणी करत आहे. डेंग्युच्या आळया आढळणाऱ्या सोसायटया आणि विविध आस्थापनाना पालिका दंड करत आहे. शहरात डेंग्युच्या रूग्णाची संख्या वाढत असताना पुणे महाापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना डेग्युसदृश्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे त्यांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली. या चाचणी मध्ये त्यांचा डेंग्यूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आयुक्तावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आयुक्त बंगल्यात औषध फवारणी

पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे निवासस्थान मॉडेलकॉलनीत आहे. या बंगल्याचा परिसर मोठा आहे. आयुक्त डॉ. भोसले यांना डेेग्युससदृश्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने आयुक्त बंगल्याची पाहणी केली आहे. तेथे औषध फवारणी केली आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने आयुक्त कार्यालयाच्या परिसराची पाहणी केली. आयुक्त बंगल्यात औषध फवारणी केली आहे.- डॉ.सुर्यकांत देवकर, आरोग्य अधिकारी ,पुणे महापालिका

Web Title: Pune Municipal Commissioner rajendra bhosale dengue like symptoms Preliminary test report negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.