पुणे महापालिका | राजकीय आश्रयाने सुरू असलेल्या दुकानदारीवर आयुक्तांचा पडणार हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:06 PM2022-03-16T12:06:36+5:302022-03-16T12:19:19+5:30

शहरातील अनेक रस्त्यांवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी कार्यालये थाटली आहेत....

pune municipal corporation action by pmc commissioner will fall on the shopkeepers | पुणे महापालिका | राजकीय आश्रयाने सुरू असलेल्या दुकानदारीवर आयुक्तांचा पडणार हातोडा

पुणे महापालिका | राजकीय आश्रयाने सुरू असलेल्या दुकानदारीवर आयुक्तांचा पडणार हातोडा

Next

पुणे : महापालिकेकडून अतिक्रमणांवर कारवाई करताना अनेकदा माननीयांच्या आश्रयामुळे महापालिका प्रशासनाला कारवाई करणे जड जाते मात्र आज महापालिका सभागृहाची मुदत संपल्याने सर्व माननीय माजी झाले आहेत हाच मुहूर्त साधून महापालिका प्रशासनाने लागलीच मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासक राज सुरू होताच पहिल्याच दिवशी शहरातील पदपथ आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या व्यवसाय करून शहर विद्रुपीकरण यात भर घालणाऱ्या अनधिकृत व्यवसायिकांना दणका दिला आहे. पदपथ आणि इमारतीच्या मोकळ्या जागेवर सुरू असलेले बेकायदा व्यवसाय आणि अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिला आहे.

पदपथांवरील बेकायदा कार्यालये, वाचनालये हटणार-

शहरातील अनेक रस्त्यांवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी कार्यालये थाटली आहेत. तर काही ठिकाणी नगरसेवकांनी पदपथावर महापालिकेच्या निधीतून वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे उभारले आहेत. ही स्ट्रक्चर्सदेखील वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे पदपथांवरील बेकायदा कार्यालये, वाचनालयेदेखील हटविण्यात येतील. मात्र, महापालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेली वाचनालये व अन्य सुविधा हटविण्याबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले

Web Title: pune municipal corporation action by pmc commissioner will fall on the shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.