Pune Municipal Corporation: पाषाण येथील ११ शोरूम, हॉटेल्सवर पुणे महापालिकेचा हाताेडा

By राजू हिंगे | Published: July 12, 2024 04:00 PM2024-07-12T16:00:16+5:302024-07-12T16:00:37+5:30

सुमारे ९० हजार चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त

Pune Municipal Corporation action in 11 showrooms hotels in Pashan | Pune Municipal Corporation: पाषाण येथील ११ शोरूम, हॉटेल्सवर पुणे महापालिकेचा हाताेडा

Pune Municipal Corporation: पाषाण येथील ११ शोरूम, हॉटेल्सवर पुणे महापालिकेचा हाताेडा

पुणे: पुणे - मुंबई महामार्गावर पाषाण येथे अनाधिकृतपणे उभारलेले ११ शो रूम, हॉटेल्स यांच्यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने आज पुन्हा एकादा कारवाई केली.  त्यामध्ये सुमारे ९० हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. 

कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली होती. मात्र, त्यानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेलमध्ये ड्रग्स सापडले होते. त्यांनंतर महापालिकेकडून फर्ग्युसन रस्त्यापासून कारवाईस सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर  बाणेर, खराडी, औंध, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर या भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने जोरदार कारवाई केली होती. पालिकेच्या बांधकाम विभागाने आज पाषाण येथे ही कारवाई करण्यात आली. बांधकाम हे एचईएमआरएल या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या बाबत एचईएमआरएल यांच्याकडुन तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच हे क्षेत्र पीएसपी झोन मध्ये येत आहे. 

पाषाण येथे अनाधिकृतपणे उभारलेले ११ शो रूम, हॉटेल्स यांच्यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने आज पुन्हा एकादा कारवाई केली. या मधील ७ मिळकतधारकांनी  न्यायालयातून स्थगिती आदेश आणले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. यावेळी कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. चतुःशृंगी पोलीस स्टेशन चे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. खबरदारीचा उपाय म्हणून अग्नीशमन विभागाची गाडी तयार ठेवण्यात आली होती अशी माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी सुनिल कदम यांनी दिली.

Web Title: Pune Municipal Corporation action in 11 showrooms hotels in Pashan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.