पुणे महापालिकेकडून तब्बल ४२ ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; सर्वाधिक क्षेत्र हडपसर- मुंढव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:58 PM2021-03-03T13:58:32+5:302021-03-03T14:07:08+5:30

नोव्हेंबरनंतर कमी होत गेलेले कोरोना बाधित फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून झपाट्याने वाढू लागले आहेत....

Pune Municipal Corporation declared 42 'Micro Restricted Areas'; The highest area is in Hadapsar-Mundhwa area | पुणे महापालिकेकडून तब्बल ४२ ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; सर्वाधिक क्षेत्र हडपसर- मुंढव्यात

पुणे महापालिकेकडून तब्बल ४२ ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; सर्वाधिक क्षेत्र हडपसर- मुंढव्यात

Next
ठळक मुद्देढोले-पाटील रस्ता, कसबा, औंध, कोथरूड, येरवड्यात दिलासा

पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. रुग्ण आढळून प्रमाण अधिक असलेल्या शहरातील 42 भाग ‘सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहेत. पालिकेच्या 15 पैकी दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही क्षेत्र असून पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकही क्षेत्र नाही.

नोव्हेंबरनंतर कमी होत गेलेले कोरोना बाधित फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अधिक खबरदारी बाळगण्यात येत आहे. शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली असून शाळा-महाविद्यालये आणि खासगी क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार, पालिकेने ज्या भागात करोना रूग्ण वाढत आहेत असे भाग सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र निश्चित काही प्रमाणात निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे.
===
सोसायट्यांमध्ये प्रवेश बंद
* बाहेरील नागरिकांना सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई
* या सोसायट्यांच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात येणार
* रुग्णांच्या घरातील नातेवाईक, व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई
* सोसायटीच्या सभासदांची बैठक घेऊन सूचना देत एकत्र येण्यास मनाई केली जाणार
* या  सोसायट्यांमधील कच-याची पालिकेकडून स्वतंत्रपणे विल्हेवाट
===
बाधित नसलेल्यांना कामाची मुभा
ज्या घरात कोणीही बाधित नसतील त्यांना दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडता येणार आहे. त्यांच्यावर बंधने असणार नाहीत. त्यांना सुरक्षित वावर ठेऊन सोसायटीत ये- जा करता येणार आहे.
===
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्याला अटकाव करणे आवश्यक आहे. त्याकरिता पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु आहेत. शहरात 42 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी आणि खबरदारी बाळगणे गरचेचे आहे.
- रूबल अगरवाल (अतिरिक्त महापालिका आयुक्त)
------
क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र
वानवडी 03
नगर रस्ता 03
सिंहगड रस्ता 04
बिबवेवाडी 05
हडपसर 07
शिवाजीनगर 04
धनकवडी 05
वारजे-कर्वेनगर 04
कोंढवा-येवलेवाडी 02
भवानी पेठ ०५

Web Title: Pune Municipal Corporation declared 42 'Micro Restricted Areas'; The highest area is in Hadapsar-Mundhwa area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.