मागणी २०० लसींची आणि पुणे महापालिका देतेय फक्त ५०. आम्ही लसीकरण करायचं तरी कसं ? पुण्यातील खाजगी रुग्णालयांचा सवाल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 08:29 PM2021-03-23T20:29:21+5:302021-03-23T20:31:57+5:30

नागरिकांना परत पाठवण्याची रुग्णालयांवर वेळ. . ४५ चा वरचे सरसकट लसीकरण करणार कसे ?डॉक्टरांचा सवाल.

Pune Municipal corporation is giving just 5 vaccine vials when we need to vaccinate 200 people. How do we complete the vaccination ask private hospitals in Pune. | मागणी २०० लसींची आणि पुणे महापालिका देतेय फक्त ५०. आम्ही लसीकरण करायचं तरी कसं ? पुण्यातील खाजगी रुग्णालयांचा सवाल.

मागणी २०० लसींची आणि पुणे महापालिका देतेय फक्त ५०. आम्ही लसीकरण करायचं तरी कसं ? पुण्यातील खाजगी रुग्णालयांचा सवाल.

Next

पुणे महापालिकेकडे वारंवार मागणी करून देखील पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप रुग्णालयांनी केला आहे. दिवसभरात जवळपास २०० हुन अधिक रुग्णांची नोंदणी झालेली असताना महापालिकेकडून फक्त ५ व्हायल उपलबध करून दिल्या जात असल्याने लसीकरण नेमका करायचा कसं असा प्रश्न या रुग्णालयांना पडला आहे. 

पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केले जावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरण केंद्र देखील वाढवत लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे सगळं सुरु असताना लसीचा उपलब्धतेवरून सुरु असलेला गोंधळ अजूनही संपायला तयार नाही. गेल्याच आठवड्यात कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचा उपलब्धतेवरून गोंधळ झाला होता. कोव्हीशिल्ड चा ऐवजी कोव्हॅक्सिन चा लसी आल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण थांबले होते. त्यातच पहिल्या टप्प्यातील लसीकरण रद्द झाल्याचा मेसेज अनेक लोकांना गेला होता. त्यावरून अर्थातच नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. हा गोंधळ मिटेपर्यंतच आता पुन्हा एक नवा सुरु झालेला आहे. 

महापालिकेकडून पुरेशा लसींचा पुरवठाच केला जात नसल्याची तक्रार अनेक खासगी रुग्णालयांनी केली आहे. संपूर्ण दिवसासाठी ५ व्हयल्स म्हणजेच फक्त ५० लसी पुरवल्या जात असल्याच या रुग्णालयांचे म्हणणे आहे. अशी परिस्थिती असेल तर लसीकरण कसे करायचे असा सवाल रुग्णालय प्रशासनाचा वतीने महापालिकेला विचारला जात आहे. 

याबाबत बोलताना एक डॉक्टर म्हणाले ," आम्ही दिवसाकाठी साधारण २०० लसीकरणाची सोय करतो. त्यातच जे ज्येष्ठ नागरिक थेट येऊन लसीकरण करून घेऊ इच्छितात त्यांना देखील लसीकरण करण्यासाठी आम्हचा कडे व्यवस्था करण्यात अली आहे. पण असे असताना महापालिकेने फक्त ५० लस उपलब्ध करून दिल्याने लसीकरण रद्द करायची तसेच नागरिकांना परत पाठवायची वेळ आमच्यावर आली. एकीकडे आज सरकार ने ४५ वर्षांचा वरचा सगळ्यांचे सरसकट लसीकरण सुरु केले आहे. आणि दुसरीकडे नोंद असलेल्या लोकांना देखील पुरेशी लस उपलब्ध होत नाहीये. अशा परिस्थिती मध्ये आम्ही कसे हे काम करायचे ते आम्हाला कळत नाहीये. वाढती संख्या लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे याकडे खरंतर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे." 


दरम्यान याबाबत विचारणा करण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. 

Web Title: Pune Municipal corporation is giving just 5 vaccine vials when we need to vaccinate 200 people. How do we complete the vaccination ask private hospitals in Pune.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.