आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाच्या कल्चर हॉटेलवर पुणे महापालिकेचा हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 02:45 PM2024-06-25T14:45:30+5:302024-06-25T14:46:15+5:30

पुण्यात पब, हॉटेल रात्री अपरात्री सुरु असून सर्रासपणे अल्पवयीन मुलांना ड्रग्स विक्री होत असल्याचे समोर आल्यावर प्रशासन खडबडून जागे

Pune Municipal Corporation hammers unauthorized bars on FC Road Action against culture hotel of MLA Siddharth Shirole | आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाच्या कल्चर हॉटेलवर पुणे महापालिकेचा हातोडा

आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाच्या कल्चर हॉटेलवर पुणे महापालिकेचा हातोडा

पुणे: कल्याणीननगर अपघात प्रकरणानंतर पब आणि बारवर रात्री बंदी घालण्यात आली होती. तर अनधिकृत बारवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पुन्हा एकदा पुण्यात पब, हॉटेल रात्री अपरात्री सुरु असल्याचे समोर आले. तसेच त्याठिकाणी ड्रग्सविक्री होत असल्याचेही  व्हिडिओ मिळाले. 

पब मध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री दीड वाजेनंतर पब सुरू ठेऊ नयेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, अशा सूनचा पब चालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मात्र या आदेश आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या व्हिडिओमध्ये असलेल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे. त्यानंतर पोलीस आणि उत्पादनशुल्क विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली. तर आता पुणे महापालिकेने फर्ग्युसन रस्त्यावरील अनधिकृत हॉटेलवर बुलडोझर कारवाईला सुरुवात केली आहे.  त्यात भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेच्या चुलत भावाच्या हॉटेलवर पालिकेने हातोडा चालवला आहे. फर्ग्युसन रस्त्यावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या चुलत भावाचे कल्चर नावाचे हॉटेल आहे. त्या हॉटेलचे अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हातोडा चालवला आहे. तर फर्ग्युसन रस्त्यावरील इतर अनधिकृत हॉटेल आणि बारवर कारवाईला सुरुवात झालीये.

ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर पुणे शहरात कोट्यवधींचे ड्रग्स पकडण्यात आले होते. पोलिसांनी कडक कारवाई करत शहर पिंजून काढ्ले होते. त्यानंतर कल्याणीनगर अपघात प्रकरण घडले. त्यामध्ये अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दारू, ड्रग्स देतानाचे व्हिडिओ समोर आले. त्यावरून पोलिसांनी पुन्हा पब, बार बाबत कडक नियमावली जाहीर केली. परंतु रविवारच्या ड्रग्स फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स प्रकरणाने पुन्हा प्रशासन थंड झाले आहे का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. त्यावरून आता पोलीस, महापालिका यांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे.

Web Title: Pune Municipal Corporation hammers unauthorized bars on FC Road Action against culture hotel of MLA Siddharth Shirole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.