पुणे महापालिकेच्या ३ हजार कोटीच्या ठेवी असताना ५३० कोटीचे कर्ज कशासाठी? स्वयंसेवी संस्थाचा सवाल

By राजू हिंगे | Published: November 7, 2023 02:17 PM2023-11-07T14:17:59+5:302023-11-07T14:19:22+5:30

कर्ज काढायची एवढीच हौस असेल तर ठेवींच्या आधारे कमी व्याजदरात त्याच बॅंकाच कर्ज देतात, या पर्यायाचा विचार करावा

Pune Municipal Corporation has deposits of 3000 crores why 530 crores loan Question of voluntary organization | पुणे महापालिकेच्या ३ हजार कोटीच्या ठेवी असताना ५३० कोटीचे कर्ज कशासाठी? स्वयंसेवी संस्थाचा सवाल

पुणे महापालिकेच्या ३ हजार कोटीच्या ठेवी असताना ५३० कोटीचे कर्ज कशासाठी? स्वयंसेवी संस्थाचा सवाल

पुणे : पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटी रूपयांच्या ठेवी विविध बॅकामध्ये असताना २३ समाविष्ट गावातील सांडपाण्यासाठी ५३० कोटी रूपयांचे कर्ज कशासाठी काढायचे असा सवाल स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला आहे.  बॅकांचे वाढते  व्याजदर लक्षात घेता  साडेनउ ते दहा  टक्के दराने घ्यावे लागेल पण पालिकेच्या  ठेवी ७.९२ टक्के दराने बॅंकांमध्ये पडून आहेत. कर्ज काढायची एवढीच हौस असेल तर ठेवींच्या आधारे कमी व्याजदरात त्याच बॅंकाच कर्ज देतात. या पर्यायाचा विचार करावा अशी  मागणीही सजग नागरिक मंचाने केली आहे. 

पुणे महापालिकेच्या महापालिकेच्या २ हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी ४  बॅंकांमध्ये आहेत तर ७५५ कोटी रुपये गव्हेमेंट सिक्युरीट मध्ये गुंतवलेले आहेत. तरीही २३ समाविष्ट गावांतील सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५३० कोटी रुपयांचे कर्ज  भरमसाठ व्याजदराने काढण्याचे डोहाळे कशासाठी लागले आहेत. हे अनाकलनीय आहे. बॅकांचे वाढते व्याजदर लक्षात घेता साडेनउ ते दहा टक्के दराने घ्यावे लागेल. पण पालिकेच्या ठेवी ७.९२ टक्के दराने बॅंकांमध्ये पडून आहेत. याकडे  सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी लक्ष वेधले.

Web Title: Pune Municipal Corporation has deposits of 3000 crores why 530 crores loan Question of voluntary organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.