"पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या विकासकामात झालेल्या दुरावस्थेची दुचाकीवरून पाहणी करावी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 05:13 PM2021-06-04T17:13:44+5:302021-06-04T17:13:52+5:30

महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन, मनपाच्या अनेक विकास कामांना विलंब

"Pune Municipal Corporation officials should inspect the poor condition of the city's" | "पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या विकासकामात झालेल्या दुरावस्थेची दुचाकीवरून पाहणी करावी"

"पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या विकासकामात झालेल्या दुरावस्थेची दुचाकीवरून पाहणी करावी"

Next
ठळक मुद्देखोदाई करताना अनेक ठिकाणी सेवा वाहिन्या तोडल्या गेल्याने घरीच असणाऱ्या व घरून काम करणाऱ्या नागरिकांचा प्रचंड मनस्ताप

पुणे: पुणे शहरात सर्वत्र खोदाईची कामे चालू आहेत. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट, लॉकडाउन, अवकाळी पाऊस व कामगारांची वाणवा या परिस्थितीत मनपाच्या अनेक विकास कामांना विलंब झाला हे मान्य केले. तरी या कामात अनेक प्रशासकीय चुका देखील निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी एकदा शहराची दुचाकरीवरून पाहणी करावी. आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
खोदाई करताना अनेक ठिकाणी सेवा वाहिन्या तोडल्या गेल्याने घरीच असणाऱ्या व घरून काम करणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी महावितरण, बी एस एन एल तर कुठे पाण्याच्या लाईन तोडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अज्ञात कारणामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी अद्याप ही ह्या वाहिन्या दुरुस्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासाच्या प्रति प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे त्यांनी निवेदनातून नमूद केले आहे. अनेक रस्ते केबल कंपनी, महावितरण, एल अँड टी यांनी खणून अनेक दिवस झाले. मात्र अद्याप रस्ते पूर्ववत झालेले नाहीत. त्याची कालमर्यादा काय ? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. 

सर्वप्रथम आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी दुचाकी वरून शहरभर फेरी मारावी व खोदाईच्या कामाची व रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी करावी म्हणजे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना येईल. तसेच शहरातील एकूणच खोदाईच्या कामाचे ऑडिट करावे. याद्वारे एकूण खोदाईला दिलेल्या परवानग्या, प्रत्यक्षात झालेली खोदाई व नियमांचे पालन झाले का हे ही प्रशासनाच्या लक्षात येईल. अशा काही मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहेत. 

Web Title: "Pune Municipal Corporation officials should inspect the poor condition of the city's"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.