उडत्या बसेससाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा; आम्ही पैसे देऊ - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 02:08 PM2022-09-02T14:08:35+5:302022-09-02T14:08:47+5:30

नितीन गडकरी पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येवर उत्तम उपाय सांगितला

Pune Municipal Corporation should take initiative for flying buses We will pay - Nitin Gadkari | उडत्या बसेससाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा; आम्ही पैसे देऊ - नितीन गडकरी

उडत्या बसेससाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा; आम्ही पैसे देऊ - नितीन गडकरी

googlenewsNext

पुणे : पुण्यात चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर बोलण्यासाठी केंदीय मंत्री नितीन गडकरी आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी उडत्या बसेसचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येवर उत्तम उपाय सांगितला आहे. पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली. तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो”, असं नितीन गडकरींनी यावेळी जाहीर केलं आहे. 

गडकरी म्हणाले, “आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून ट्रॅफिक गेलं, तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वाकोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉलीबसची किंमत ६० लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ असं ते यावेळी म्हणाले आहेत. 

पुणे - बंगळुर महामार्गाचा विकास 

 “पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्ग आम्ही उरसे नाक्यावरून सुरू करणार आहोत. त्यामुळे मुंबईकडून बंगळुरकडे जाणारं ट्रॅफिक तिथूनच वळून जाईल. त्यामुळे मुंबई ते बंगळुर साडेचार तासांत आणि पुणे ते बंगळुर हा प्रवास साडेतीन किंवा सव्वातीन तासांत पूर्ण होईल. हा पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातून जाणारा रस्ता आहे. त्या भागाचा विकास होण्यासाठी या महामार्गाचा फायदा होईल”, असं गडकरी यांनी सांगितले आहे. 

चार मजली रस्त्यांची योजना!

“सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे”, असं गडकरी म्हणाले.

Web Title: Pune Municipal Corporation should take initiative for flying buses We will pay - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.