कोरोना रुग्णांना बेड मिळावे यासाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची रुग्णालयात नियुक्ती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:19 PM2021-03-31T20:19:00+5:302021-03-31T20:21:39+5:30

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय. डॅशबोर्ड अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी.

Pune Municipal Corporation staff appoints in the hospital to provide beds to Corona patients | कोरोना रुग्णांना बेड मिळावे यासाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची रुग्णालयात नियुक्ती.

कोरोना रुग्णांना बेड मिळावे यासाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची रुग्णालयात नियुक्ती.

Next

रुग्णांचे बेड मिळवण्यासाठी होणारे हाल लक्षात घेऊन पुणे महापालिकेने पुन्हा एकदा शहरातल्या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये आपले अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांकडून बेड व्यवस्थापनाशी संबंधित कामे करण्यात येतील. यासाठी स्वतंत्र बेड नियंत्रण कक्षाची स्थापना महापालिकेने केलेली आहे. 

 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये सर्वसामान्य लोकांना रुग्णालयात बेड मिळायला अडचणी येत आहेत. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये फिरल्या नंतरच रुग्णांना उपचारांसाठी ॲडमिशन मिळत आहे. यासाठी विभागीय आयुक्तालया तर्फे सुरू करण्यात आलेल्या डॅशबोर्ड चा देखील पुरेसा उपयोग होताना दिसत नाहीये. ही परिस्थिती लक्षात घेता आता महापालिकेने सरकारी व खाजगी रुग्णालयांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

 

या कर्मचाऱ्यांनी या हॉस्पिटल मधले बेड नियंत्रित करणे अपेक्षित आहे. संबंधित रुग्णालयाकडून रिक्त बेडची माहिती घेऊन डॅशबोर्ड अद्ययावत करण्याची जबाबदारी या कर्मचार्‍यांवर असणार आहे. यासाठी रुग्णालय आणि विभागवार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .हे अधिकारी दोन शिफ्टमध्ये काम करतील.

सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी गुरुनाथ ची पहिली लाट आली होती त्यावेळी देखील रुग्णांची अशीच परवड होत होती.त्यावेळी महापालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णांना मदत झाली होती. याच पार्श्वभूमीवर आता वाढत असलेल्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: Pune Municipal Corporation staff appoints in the hospital to provide beds to Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.