रिक्षाचालकांसाठी खुशखबर! रिक्षांचे ई रिक्षा मध्ये रूपांतर करण्यासाठी पुणे महापालिका देणार २५ हजारांचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 07:53 PM2023-03-13T19:53:08+5:302023-03-13T19:53:17+5:30

ई रिक्षांच्या चार्जिंगसाठी महापालिका शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन देखील उभारणार

Pune Municipal Corporation will give a subsidy of 25 thousand to convert rickshaws into e-rickshaws | रिक्षाचालकांसाठी खुशखबर! रिक्षांचे ई रिक्षा मध्ये रूपांतर करण्यासाठी पुणे महापालिका देणार २५ हजारांचे अनुदान

रिक्षाचालकांसाठी खुशखबर! रिक्षांचे ई रिक्षा मध्ये रूपांतर करण्यासाठी पुणे महापालिका देणार २५ हजारांचे अनुदान

googlenewsNext

पुणे :शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आता रिक्षांचे ई रिक्षा मध्ये रूपांतर करण्यासाठी २५ हजाराचे अनुदान देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. 

देशासह राज्यात इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार महापालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान योजना आखली आहे. त्यानुसार शहरात ई रिक्षा रस्त्यावर आणण्यासाठी महापालिका २५ हजराचे अनुदान देणार आहे. यापूर्वी महापालिका शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी तीन चाकी आॅटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी प्रत्येकी बारा हजार रुपये अनुदान पालिका देत होती 

दरम्यान प्रत्येक रिक्षाला ई-रिक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च येतो. प्रत्येक रिक्षाचे रीट्रोफिट करण्यासाठी  पालिका २५ हजार रुपये देईल. तर उर्वरित  ६० टक्के रक्कम वाहन मालकाला खर्च करावी लागणार आहे. याशिवाय, पालिका या इ रिक्षांच्या चार्जिंगसाठी शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन देखील उभारणार आहे.

Web Title: Pune Municipal Corporation will give a subsidy of 25 thousand to convert rickshaws into e-rickshaws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.