पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 09:01 PM2021-07-16T21:01:34+5:302021-07-16T21:01:46+5:30

महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

Pune Municipal Corporation's Board of Education Assistant Administrative Officer accepted a bribe of Rs 50,000 | पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच 

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच 

Next

पुणे : बाणेर येथील आर्किड इंटरनँशनल स्कूलमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये तक्रारदाराच्या मुलीचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्याबाबत कागदपत्रे तपासून प्रवेशास मान्यता देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने तक्रारदराकडून ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

शिवाजी बबन बोखारे ( वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. बोखारे यांनी कागदपत्रे तपासून शाळेत प्रवेशास मान्यता देण्याकरिता तक्रारदाराकडे ६० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५० हजार रूपये देण्याचे ठरले. बोखारे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Pune Municipal Corporation's Board of Education Assistant Administrative Officer accepted a bribe of Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.