आंबेगाव बुद्रूक येथील अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 03:38 PM2021-01-20T15:38:52+5:302021-01-20T15:39:40+5:30
पुणे महापालिकेच्या वतीने पाडण्यात आले बांधकाम; परिसरात इतर ठिकाणीही होणार कारवाई
धायरी : आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज परिसरातील सर्व्हे. नंबर ९ मधील असणाऱ्या अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन मजली होत असलेले बांधकाम यावेळी पाडण्यात आले.
आंबेगाव बुद्रुक येथील सर्वे नंबर ९ मधील जागेवर अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात येत होते. या अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक २ च्या वतीने विभागाने अंदाजे साडेसात हजार स्केवर फूट इतके बांधकाम पाडून कारवाई केली. सदरची कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता नामदेव गंभीरे, उपअभियंता राहुल साळुंखे, कैलास कराळे, प्रताप धायगुडे, आदी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली. जॉ कटर, दोन जेसीबी, एक ट्रॅक्टर आदीच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.