पुणे महापालिकेचा हेरिटेज वॉक; शनिवारवाडा ते विश्रामबागवाडा, ११ ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणार
By राजू हिंगे | Published: May 26, 2023 03:13 PM2023-05-26T15:13:19+5:302023-05-26T15:13:44+5:30
लाल महाल, कसबा गणपती, पुणे नगरवाचन मंदिर, महात्मा फुले मंडई, भिडेवाडा, विश्रामबागवाडा, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर , नाना वाडा या वास्तुचा समावेश
पुणे : पुणे महापालिकेने येत्या रविवारी (दि. २८) हेरिटेज वॉक आयोजित केला आहे. त्यात शनिवारवाडा ते विश्रामबागवाडा या दरम्यानच्या ११ ऐतिहासिक वास्तु पायी फिरून पर्यटकांना या वास्तुंची माहिती आणि ओळख तज्ञ गाईडदारे दिली जाणार आहे.
पुण्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पुण्यात सुमारे अडीचशे ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तू पाहण्यासाठी देशा-परदेशातून पर्यटक येतात. त्यांना या वास्तू, त्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्य जाणून घ्यायची असतात. शनिवारवाडा येथुन सकाळी ७ वाजता हेरिटेज वॉकला सुरवात होणार आहे. यामध्ये लाल महाल, कसबा गणपती, पुणे नगरवाचन मंदिर, महात्मा फुले मंडई, भिडेवाडा, विश्रामबागवाडा, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर , नाना वाडा या वास्तुचा समावेश आहे. पुणे महापालिका पर्यटकांना या वास्तुंची माहिती आणि ओळख तज्ञ गाईडदारे देणार आहे.