पुणे महापालिकेची 'ब्रेक द चेन' अंतर्गत 'रमजान' महिन्यासाठी नियमावली ; जाणून घ्या सविस्तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 05:55 PM2021-04-17T17:55:55+5:302021-04-17T17:56:30+5:30

पुणे शहरातील कोरोना वाढता कोरोना प्रादुर्भावामुळे रमजान उत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या आदेशाचे पालन बंधनकारक.....!

Pune Municipal Corporation's rules for the month of 'Ramadan' under 'Break the Chain'; Learn more .... | पुणे महापालिकेची 'ब्रेक द चेन' अंतर्गत 'रमजान' महिन्यासाठी नियमावली ; जाणून घ्या सविस्तर....

पुणे महापालिकेची 'ब्रेक द चेन' अंतर्गत 'रमजान' महिन्यासाठी नियमावली ; जाणून घ्या सविस्तर....

googlenewsNext

पुणे: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शहरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु आहे. याच दरम्यान, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना १४ एप्रिलपासून सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. तसेच १४ एप्रिलपासून सुरू झालेला रमजान महिना संपेपर्यंत या नियमांचे पालन बंधनकारक राहणार आहे. 

रमजानसाठी असलेली नियमावली पुढीलप्रमाणे: 
* कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मस्जिद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावे. नमाज पठणाकरिता मशिदीत किंवा मोकळ्या जागेत येऊ नये. 
* सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सोशल डिस्टनसिंग व  स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून पवित्र रमजान महिना साजरा करावा. 
* रमजान काळात मुस्लिम बांधव 30दिवस पहाटे पासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पूर्वी तो सोडतात.या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ, अन्न पदार्थ या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी संबंधित प्रभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त व पोलीस प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी.
* रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येतात. परंतु, यावेळी कोरोनाचा वाढता पाहता आपापल्या घरातूनच दुवा पठण करावे.
* शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्यात येत २६व्या दिवशी करण्याची प्रथा आहे.या निमित्ताने मुस्लिम नागरिक तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण व नफील नमाज अदा करतात. परंतु,यंदा हे कार्यक्रम घरीच साजरे करावेत. 
* धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करून बंद जागेत शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे.
* महापालिका क्षेत्रात संचारबंदी लागू असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत व नागरिकांनी  विनाकारण रस्त्यावर फिरू नये.
* रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, धार्मिक, सामाजिक , सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. 
* धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते,राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या उद्देशाने जनजागृती करावी. 
* महाराष्ट्र शासन,गृह विभाग, महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. 
* संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

Web Title: Pune Municipal Corporation's rules for the month of 'Ramadan' under 'Break the Chain'; Learn more ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.