पुणे महापालिका निवडणूक | प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 05:55 PM2022-06-23T17:55:08+5:302022-06-23T17:57:05+5:30

यादी पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध...

Pune Municipal Election Ward wise draft voter list announced | पुणे महापालिका निवडणूक | प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर

पुणे महापालिका निवडणूक | प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर

googlenewsNext

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरुवारी (२३ जून) प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर (https://www.pmc.gov.in) तसेच प्रभागाची यादी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.

महापालिकेच्या नियोजित ५८ प्रभागनिहाय प्रसिद्ध यादीत, नागरिकांनी त्यांचे नाव त्या-त्या प्रभागाच्या मतदार यादीतच असल्याची खात्री करावी, असे आवाहन महापालिकेच्या निवडणूक विभागाने केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि. ३१ मे २०२२ रोजीची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरून त्याची विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे इत्यादी स्वरुपाची कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जात नाहीत. त्यामुळे दि. ३१ मे रोजीच्या विधानसभा मतदारयादीत ज्यांची नावे आहेत, अशा मतदारांनाच महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

- सदर प्रारूप मतदार यादीवर १ जुलै पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. या हरकती/सूचना संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे अथवा मुख्य निवडणूक कार्यालय, सावरकर भवन, शिवाजीनगर येथे दाखल करता येणार आहेत.

- हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.

Web Title: Pune Municipal Election Ward wise draft voter list announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.